Breaking News

महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी बीडमध्ये 'आप' च्या वतीने भुकेलेल्यांना खिचडी वाटप


क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बीडमधील पुतळ्यास आम आदमी पार्टीतर्फे पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन 

बीड :  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रविवारी (दि.११) सकाळी अभिवादन करण्यात आले. अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर शहरातील शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, सुभाष रोड व  आंबेडकर चौक परिसरातील गरजूंना व भुकेलेल्यांना खिचडीचे वाटप करण्यात येऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आपच्या कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरातच नव्हे तर जिल्हाभरातून कौतुक केलं जातं आहे.


बीड शहरामध्ये मागील सोळा आठवड्यापासून आम आदमी पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून शहरांमधील विविध समस्या वर नगरपालिकेचे लक्ष वेधण्याचे काम केले जात आहे. लॉकडाऊनच्या याकाळामध्ये स्वच्छतेचा विषय घेऊन जनतेसमोर न जाता भुकेलेल्या लोकांना जेवण देण्याचं किंवा एक टाइम का होईना त्यांची भूक भागविण्याचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे. रविवारी सकाळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर लगेचच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,  बसस्थानक, सुभाष रोड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील गरजू व रस्त्याने बसलेल्या मानसिक रुग्णांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे,  शहर प्रमुख सय्यद सादेक, जिल्हा सचिव रामधन जमाले,जिल्हा संघटनमंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान आम आदमी पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे. 

भुकेलेल्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न..

लॉकडाऊन जनतेवर लादण्यात आलेला आहे. कसल्याही प्रकारची जनतेची गोरगरिबांची रस्त्याने बसलेल्या मानसिक रुग्णांची भुकेने व्याकूळ झालेल्या लोकांचा कसलाही विचार न करता हा लोक डाऊन लावला आहे. लॉकडाऊनच्या याकाळामध्ये स्वच्छतेचा विषय घेऊन जनतेसमोर न जाता भुकेलेल्या लोकांना जेवण देण्याचं किंवा एक टाइम का होईना त्यांची भूक भागविण्याचे आम्ही आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रयत्न करीत असल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा


No comments