Breaking News

भररस्त्यात जावायानेच केला सासुचा धारदार कोयत्याने खून !


डोळ्यात मिरची पूड टाकून केला खून करून मारेकरी त्यांचीच मोटार सायकल घेऊन झाला पसार : साळेगाव येथील घटना

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे दाखल

गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील साळेगाव येथे महामार्गावर चाळीस वर्षीय सासूचा तिच्या जावायानेच डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने मानेवर व हातावर वार करून भर रस्त्यात खून केला आहे. तर त्या महिले सोबतचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथिल सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या बाबतची माहिती अशी की, धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे व तिच्या नात्यातील अंकुश दिलीप धायगुडे हे दि.२५ एप्रिल रोजी लोचना हिचा जावई अमोल इंगळे यास भेटण्यासाठी आले होते; परंतु त्यांची भेट झाली नाही परत जात असताना ते साळेगाव येथील केज-कळंब महामार्गावरील दिलीप मेडकर यांच्या संताजी हॉटेल समोर अमोल वैजिनाथ आला. त्या वेळी त्या तिघात भांडण झाले. त्या नंतर अंकुश धायगुडे यांच्या मोटरसायकलवर बसून लोचना धायगुडे केज मार्गे अंबाजोगाईकडे जाण्यास निघाली. त्या वेळी अमोलने संताजी हॉटेल समोर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार कोयत्याने अंकुशच्या हातावर वार केला. या झटापटीत लोचना धायगुडे ही मोटरसायकल वरून खाली पडली. ती खाली पडताच अमोल इंगळे याने तिच्या मानेवर व गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. वर चुकविण्याच्या प्रयत्नात लोचना तिच्या डाव्या हातावर देखील चार-पाच खोलवर वार झालेले असून खोलवर जखमा आहेत. 

दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस कादरी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अंकुश यास केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक प्रथम उपचार आले यावेळी अंकुश यांनी सांगितले की अमोल इंगळे व त्याच्या सोबत अन्य एक या इसम असल्याची माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.

मयताचीच गाडी घेऊन मारेकरी झाले पसार :- खून केल्यानंतर अमोल याने जखमी अंकुश धायगुडे याचीच शाईन गाडी घेऊन तिच्यावरुन तो पसार झाला आहे. सदर मोटार सायकल क्र एम एच ४४/ व्ही-०५६४ ही सोनोजवळा येथे आढळून आली आहे.

घटनास्थळी आढळले आरोपीची घड्याळ मिरचीपूड :-  हॉटेल संताजी समोर मारेकरी अमोल यांच्या हातातील फास्टट्रॅक कंपनीची घड्याळ व मिरचीपूड आढळून आली आहे. 

कोयते जप्त :- घटना स्थळापासून गांजीकडे जाणाऱ्या रस्त्या लगत २०० मीटर अंतरावर रक्ताने माखलेले कोयते टाकून दिलेले आढळून आले ते कोयते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केजकडे जाणाऱ्या पुलावरील ही रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेला दगड :-  पुलावर घटना स्थळा पासून १५० ते २०० मीटर अंतरावर रक्त पडलेले असून शेजारी रक्ताने माखलेला दगड पडलेला आहे.  

व रिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट :-  घटनेची माहिती माहिती माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

No comments