Breaking News

सलून व्यवसायिकांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा-दत्ता वाकसे

बीड : सध्या संपूर्ण देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनासारख्या महामारीने दहशत पसरली आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात छोटे-छोटे व्यवसाय धारक आणि ज्यांचे की हातावर पोट आहेत आशा छोटे छोटे व्यवसाय धारकांना खूप मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे त्याचबरोबर त्यांचे जीवन हे केवळ आणि केवळ सलून व्यवसायावर आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील संपूर्ण सलून व्यवसायिकांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करत धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीय. 

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की आज पाहिले तर खूप परस्थिती कोरोना रोगाची भयानक झालेले आहे या परिस्थितीमुळे छोटे छोटे व्यवसाय सारखे स्वतःचे पोट दिवसभर काम केल्यानंतरच भरता येतं असे व्यवसाय धारक  आहेत त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यांच्या कुटुंबांना जनजीवन जगण्यासाठी केवळ आणि केवळ सलूनचा व्यवसाय आहे त्यामुळे या ठिकाणी सलून व यासारखे छोटे छोटे व्यवसाय सारखे खूप मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला आलेले आहेत त्यामुळे सलून व्यवसाय धारकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी त्यामुळे त्यांना रोजचे जनजीवन  जगण्यासाठी मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ येणार नाही त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ राज्यातील व्यवसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वाकसे यांनी म्हटले आहे. 

No comments