Breaking News

आ. संदीप क्षीरसागर यांच्या निर्देशानंतर बीडच्या कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जा सुधारला


कोविड सेंटरची केली पाहणी : बांधितांसोबत संवाद साधून आ.  क्षीरसागर यांनी उत्तम सुविधा देण्याबाबत रूग्णांना केले आश्वस्त 

बीड :  आ.संदीप  क्षीरसागर यांनी दि.१७ एप्रिल २०२१ रोजी बीड जिल्हा रुग्णालयासह शहरातील सर्व कोविड सेंटर्स ची पाहणी केली असता कोविड बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा, स्वच्छता व अन्य बाबी बाबत तक्रारी केल्या होत्या. यानंतर तातडीने आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी प्रशासनाला जेवणाचा दर्जा सुधारणे व अन्य बाबींबाबत निर्देश दिले.

काल पुन्हा कोविड सेंटर्सची आ. संदीप भैय्या यांनी पाहणी केली व  कोविड बाधित रुग्णांना दिले जाणार जेवणाचा दर्जा तपासण्यासाठी आ. संदीप भैय्या यांनी स्वतः त्यांच्या सोबत त्यांना दिले जाणारे जेवण केले. जेवणाचा दर्जा आता पूर्वीपेक्षा व्यवस्थित झाला आहे. प्रशासन चांगले काम करत आहेत. यावेळी सर्व कोविड बांधितांसोबत संवाद साधून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी अजून उत्तम सुविधा देण्याबाबत आश्वस्त केले.

No comments