Breaking News

केज येथील खरेदी विक्री संघास हमी दराने रब्बी भरड धान्य खरेदीस परवानगी


शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी व मका याची खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी करावी :  भागवत सोनवणे

गौतम बचुटे । केज  

शासनाच्या आधारभूत भरडधान्य खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाकडे ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन संचालक भागवत सोनवणे यांनी केले आहे.

शासन शेतकऱ्यांन पिकविलेल्या धान्याला रास्त हमीभाव देणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असून व्यापाऱ्यां कडून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केज येथे भरडधान्य खरेदी योजने रास्त भावाने गहू, ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी केज येथे केंद्र सुरू करण्यास पणन महासंघाची परवानगी मिळाली आहे. 

त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उत्पादित झालेली भरड धान्य गहू, ज्वारी व मका खरेदी विक्री संघाकडे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केज तालुका सहकार खरेदी-विक्री संघ केजचे संचालक भागवत सोनवणे यांनी केले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सात बाराचा ऑनलाईन उतारा, ८-अ चा उतारा, चालू वर्षाचा पिक पेरा, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक यांच्या प्रती आवश्यक आहेत. या बाबत काही अडचण किंवा समस्या असल्यास खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बिभीषण ठोंबरे यांच्याकडे ९३२५८३२६२५ या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील संचालक भागवत सोनवणे यांनी केले आहे.

No comments