Breaking News

आष्टीत उभारणार तात्काळ ऑक्सिजन प्लांट : आ. बाळासाहेब आजबे यांची माहिती


के. के. निकाळजे । आष्टी  

कोरोना या महाभयंकर आजाराने सर्वत्र हाहाकार माजवला असून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात कोविड19चे रुग्ण निघत आहेत अनेकांची ऑक्सिजन लेवल कमी होत आहे ,कोविड रुग्णांना रोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत असल्याने ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे सर्वत्रच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे त्यामुळेच आपण पालकमंत्री धनंजय मुंडे,  जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून आष्टी येथे तात्काळ ऑक्सीजन प्लांट उभारण्यास  शिफारस करून प्रस्ताव दाखल केला आहे  त्यास पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी होकार दर्शवला असून लवकरच आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात साठी आष्टी येथे ऑक्सीजन प्लांट उभा करण्यात येणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

        पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की रोजच मतदारसंघात दोनशे ते तीनशे पेशंट निघत आहेत व त्यातील 10 ते 20 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे शासकीय व खाजगी कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण  झाला आहे. त्यामुळे आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्याशी ऑक्सीजन प्लांट उभारण्याबाबत सविस्तर चर्चा केली त्यास वरील सर्वांनीच लवकरच आष्टी येथे ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येईल असा आपल्याला शब्द दिला आहे.

 त्यासाठीचा प्रस्ताव संबंधित अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असून दोन दिवसात त्यास परवानगी देण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी संबंधितास दिले आहेत, त्यामुळे लवकरच आष्टी येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होणार आहे ऑक्सीजन प्लांट चे काम  तात्काळ सुरू करण्यात येणार असून  लवकरात लवकर  ऑक्सीजन निर्मिती कशी होईल  यासाठी  आपण  प्रयत्नशील  आहोत ,त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर सह बीड जिल्ह्यात व इतर ठिकाणीही ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. हा ऑक्सीजन प्लांट सुरु झाल्यानंतर मतदारसंघासह आसपासच्या अनेक तालुक्यांचा ही ऑक्सिजनचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून लवकरात लवकर हा प्लांट कसा सुरु होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले.

No comments