Breaking News

"शैक्षणीक होमकुंड"साठी सो.क्ष.कासार समाजाचे एक पाऊल पुढे


समाजाच्या शैक्षणीक उत्क्रांतीसाठी मिशन प्रशासन

शिरूर कासार : कासार समाजातील स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेस बसण्यास उद्युक्त करणे जे बसणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे विद्यार्थी दत्तक घेणे तसेच समाजातील जे अधिकारी स्पर्धा परीक्षा देत अधिकार पदावर कार्यरत आहेत त्यांचे मार्फत विद्यार्थ्यांना दर रविवारी निशुल्क ऑनलाईन मार्गदर्शन करणे यासाठी मिशन प्रशासन हा उपक्रम सुरू करून समाजहिताचे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तसेच नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  करीत "मिशन प्रशासन" तर्फे लवकरच एक "युट्यूब चॅनल" व "फेसबुक पेज" सुरू होत आहे.

यासाठी कासार समाजातील "टीम संवाद" मार्फत व अ.भा. कासार मध्यवर्ती मंडळाचे सहकार्याने "मिशन प्रशासन" हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणणे कामी लातूरचे निवासी जिल्हाधिकारी मा.अरविंदजी लोखंडे, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर व "टीम संवाद" चे गोविंदभाऊ अंधारे यांची मेहनत महत्वाची ठरली.

अवघ्या चार महिन्यात आत्ता पर्यंत समाजाचे २२५ विद्यार्थ्यी सहभागी झाले असून संपूर्ण भारतातून केंद्रशासन,राज्यशासन व न्याय व्यवस्थेतील ६५ अधिकारी या अभियानात सहभागी होऊन आपले योगदान देत आहेत व अजूनही अधिकारी व विद्यार्थ्यांचा ओघ सुरूच आहे. कासार समाजाचे प्रशासनात अधिकारी वाढून समाज बलशाली व्हावा व समाजाची प्रशासकीय ताकद वाढवावी या साठी हा एक प्रयत्न.

तसा कासार समाज हा व्यवसायाभिमुख

असल्याने पाल्याचे शिक्षणा कडे फारसे लक्ष देत नाही त्यामुळे "मिशन प्रशासन"ने ही जबाबदारी घेतली आहे एखादा समाज बांधव हा अधिकारी झाल्यावर त्याचा स्टेजवर बोलावून सत्कार करण्यापेक्षा त्याच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असावा हा उद्देश तसेच अशा विद्यार्थ्यांचे मागे समाज ठामपणे उभा आहे असे चित्र तयार व्हावे तसेच अधिकारी होण्याचे स्वप्न हे त्या विद्यार्थ्याचे किंवा त्याच्या कुटुंबीयांचे न राहता ते सर्व समाजाचे स्वप्न व्हावे!या भावनेतून सदर अभियान सुरू करण्यात आले आहे.

हे अत्यंत संयमाचे कार्य असून त्याचे परिणाम समोर येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे त्यामुळेच हे एक निरंतर चालणारे "शैक्षणिक हवनकुंड" असून ते निरंतर तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागणार हे निश्चित आहे.

No comments