Breaking News

केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली जानेगाव आणि आडस येथे वीज पडून म्हैस व गाय दगावली

गौतम बचुटे केज 

केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली असून आडस आणि जानेगाव येथे अवकाळी पाऊस आणि वीज पडून एका शेतकऱ्याची म्हैस व गाय दगावली आहे.

ता बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २६ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या दरम्यान विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसात केज तालुक्यातील जनेगाव येथील बंदर नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील हनुमान वस्तीतील आंब्याच्या झाडावर वीज पडली यात आंब्याच्या झाडाखाली बांधलेली अरविंद रामकीसन शिंदे यांची म्हैस मरण पावली. तर आडस येथेही वीज पडून काशिनाथ विश्वनाथ आकुसकर यांची गाय मरण पावली आहे. या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच तहसीलदार मेंढके साहेब यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी भागवत पवार व तलाठी खतीब यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेल्याचे समजते. 


No comments