Breaking News

गाढव मेले ओझाने,शिंगरू मेले हेलपटाणे....! एका इंजेक्शन साठी नातेवाईकांचा जीव धोक्यात का घालता ? : प्रशांत डोरले


बीड : गेल्या काही काळापासून कोरोला रुग्णांची वाढती संख्या व रेमीडीसिव्हार इंजेक्शनचा होणारा अपुरा पुरवठा याच्यात अजूनही नियमितता आलेली नाही.

आजतागात रेमिडीसिव्हर इंजेक्शन चा तुटवडा कायम आहे. जिल्हा आरोग्य विभागाने रुग्णांची नोंदणी जिल्हा औषध प्रशासनाकडे सुपूर्द करत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्यात आली आहे. परंतु नोंदणी केल्यानंतर २४ ते ३६ तासांच्या अवधीने रुग्णाला रेमिदिसिव्हर इंजेक्शन साठी टोकण दिले जाते, व पुन्हा तेथून रुग्णांची एजन्सी व आता दवाखान्यातील स्टाफ च्या आधारे टोलवा टोलवी केली जात आहे. आधीच रुग्णाच्या आजाराने चिंतेत असलेले नातेवाईकांची या प्रकाराने दमछाक झाल्याने ते काहीसे आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहेत तर बऱ्याच ठिकाणी हमरी-तुमरी वरही येत आहेत. 


प्रशासनाच्या या गोंधळलेल्या अवस्थेत खेड्यापाड्यातून आलेल्या अशिक्षित लोकांना तसेच रुग्णांच्या काळजीने हतबल झालेल्या नातेवाईकांचा जीव जेरीस आला आहे. शिवसंग्राम हेल्थ लाईनच्या सदस्यांनी काल तिथे जाऊन नातेवाईक व कर्मचारी यांच्याशी चर्चा करत,  रेमिडीसिव्हर इंजेक्शनची नोंदणी व वितरण ही प्रक्रिया खाजगी रुग्णालयाच्या मध्यस्थीनेच जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा औषध प्रशासनाच्या मार्फत रुग्णांपर्यंत पोहोच करण्यात यावी अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडी बीड शहराध्यक्ष तथा शिवसंग्राम हेल्थ लाईन प्रमुख प्रशांत डोरले यांनी माध्यमांद्वारे केली आहे.

रेमिडीसिव्हर साठी नातेवाईकांची होणारी हेळसांड रोखून, रुग्णालयाच्या माध्यमातून रेमिडीसिव्हर उपलब्ध करून देण्यात यावे :- प्रशांत डोरले

खाजगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णाला रेमिडीसिव्हर इंजेक्शन ची गरज भासल्यास त्यासाठी जिल्हा औषध प्रशासनाच्या वतीने अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात केली जाते, ज्या ठिकाणी ही नोंदणी केली जाते अश्या ठिकाणी नातेवाईक हे रोज १५०-२०० च्या पटीत असतात. विविध रुग्णालयातून येणारे हे नातेवाईकांमध्ये एकमेकांशी संपर्क होवून कोरोना रुग्णांची संख्या ही वाढण्याची संभावना मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळेच  एका रुग्णाला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात घालने जिल्हा प्रशासनाला कुठपर्यंत योग्य वाटते असा सवाल ही शिवसंग्राम हेल्थ लाईन प्रमुख प्रशांत डोरले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे विचारला आहे.


No comments