Breaking News

कड्यातील अतिक्रमणावर चार महिन्यापासून कार्यवाहीच केली नाही


जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली कार्यवाहीची मागणी

शेख कासम । कडा 

आष्टी तालुक्यातील कडा येथिल अहमदनगर-जामखेड मार्गालगत असलेले हजरत मौलाली बाबा दर्गा व कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीला चिटकून चालू असलेले अतिक्रमण तात्काळ थांबवावे व या संरक्षण भितींला लगद असलेले सर्वच अतिक्रमण काढून हा परिसर अतिक्रमण मुक्त करावे अशी लेखी तक्रार ग्रा.प.कार्यालय कडा यांच्याकडे दि. १६ डिसेंबर २०२० रोजी ग्रामस्थांनी केली होती. ह्या तक्रार अर्जाची दखल ४५ दिवसांनी म्हणजेच दि.३० जानेवारी २०२१ रोजी ग्रा.प.कडाने घेतली असे दाखवत तुकाराम लक्ष्मण कर्डिले,प्रविण प्रल्हाद पाचे व संतोष शिलामन जाधव या तीनच अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या व बाकीचे अतिक्रमण आमच्या हद्दीत येत नाही असे तोंडी तक्रारदारांना सांगितले. 

दिलेल्या नोटीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे अतिक्रमण धारकांना सात दिवसांची मुदत दिली होती ती मुदत संपवून अजून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी देखील ग्रा.प.कडाने अतिक्रमण काढले नाही म्हणुन ग्रामस्थांनी तहसिलदार व गट विकास अधिकारी आष्टी यांच्याकडे लेखी तक्रार दि.०३मार्च२०२१ रोजी केली ह्या दोन्हीही कार्यालयातून कार्यवाहीचे कसलेच उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा तहसिल व पंचायत समिती आष्टी यांना दि.१६ मार्च रोजी स्मरण पत्र दिले असता गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे प्रतिलीपी म्हणून कार्यवाहीचे पत्र पोस्टाने दि. १६ मार्च व ०४ एप्रिल २०२१ रोजी असे दोन पत्र तक्रारदारांना मिळाले.त्या पत्रात नमूद केले आहे की प्रति श्री.खिलारे ए.डी. ग्रामसेवक कडा ग्रा.प.कडा पुर्णपणे कार्यवाही करत नाही व वेळकाडू पणा करत असल्याबाबतचा विषयांकित अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला आहे कडा गावातील हजरत मौलाली बाबा दर्गा व कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीला चिटकून असलेले अतिक्रमण काढून हा परिसर अतिक्रमण मुक्त करावे असे सोबत जोडलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी व तसा अहवाल या कार्यालयास सादर करून संबधितास आंदोलनापासुन परावृत्त करावे. या दोन्हीही आदेश पत्राची दखल ग्रा.प.कडाने घेतली नाही व आजरोजी पर्यंत अतिक्रमण काढले नाही. कडा ग्रा.प.कायदेशीर कार्यवाही का करत नाही काय म्हणून ते आतिक्रमण धारकांवर इतके मेहरबान आहेत.वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश पत्र आले तरीही अतिक्रमणावर कार्यवाही नाही.

नेमके काय केल्यावर हे अतिक्रमण कडा ग्रा.प. काढणार आहे चार महीन्यापासून बेकायदेशीर पणे चालू असलेले व पुर्वी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर पध्दतीने ह्या-त्या कार्यालयात हेलपाटे मारतायत तरी न्याय मिळणार कि नाही कायदे लोकशाही अधिकाऱ्यांचे कर्तव्य काही आहे कि नाही. फक्त तीन जणांना नोटीस देऊन बाकीचे आतिक्रमण आमच्या हद्दित येत नाही असे तोंडी सांगितले लेखी मागितले तर तसे लेखी आम्हाला देता येत नाही तुम्ही बाकीच्या अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम उप विभाग कार्यालय आष्टी यांच्याकडे तक्रार करा असे सांगितले.तर दि.०९फेब्रुवारी२०२१ रोजी उप अभियंता बांधकाम उप विभाग कार्यालय आष्टी येथे तक्रार अर्ज देण्यासाठी ग्रामस्थ गेले असता तेथिल अधिकारी यांनी सांगितले कि हा रस्ता आमच्या हद्दित येत नाही तुम्ही उप विभाग कार्यालय अहमदनगर यांच्याशी संपर्क करा असे लेखी ही दिले आहे. उप विभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उप विभाग अहमदनगर यांच्याकडे लेखी तक्रार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी केली यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा दि.१७ मार्च २०२१रोजी स्मरण पत्र दिले आहे. 

हे बेकायदेशीर केले जाणारे अतिक्रमण काढण्यासाठी आता आम्हांला फक्त तुमच्यावरच विश्वास आहे.आपण हजरत मौलाली बाबा दर्गा व कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीला लागून असलेले अतिक्रमण ज्यांना ग्रा.प.ने नोटीस दिले त्यासह सगळेच अतिक्रमण काढण्याचे सक्तीचे आदेश द्यावे व हा परिसर अतिक्रमण मुक्त करावे.अन्यथा गावापासून जिल्ह्यापर्यंत तक्रार अर्जावर कार्यवाही न झाल्याने या कोरोना काळात नाइलाजाने आम्हांला आंदोलन करावेच लागेल यांची नोंद घ्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे या निवेदनावर रहेमान सय्यद ,अल्ताब शेख,अजहर पानसारे,इस्माइल सय्यद,उस्मान सय्यद,आमिन शेख,नसीर शेख,सिंकदर सय्यद,शेख सादिक,सोहेल तांबोळी,अनिस मोमीन, शेख शाहरुख,फिरोज तांबोळी, शहाबाज पानसारे सह आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments