Breaking News

शिवसंग्राम हेल्थलाईनचा रुग्णांना आधार...!


शिवसंग्रामच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात कोवीड रुग्णांनासाठी हेल्थलाईन कार्यान्वित..

बीड  :  शिवसंग्रामचे  संस्थापक अध्यक्ष आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून व युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील गरजू कोवीड रुग्णांच्या मदतीसाठी शिवसंग्राम हेल्थलाईनची उभारणी केलेली आहे.

      गेल्या तीन दिवसांपासून  बीड जिल्ह्यातील कोविड रूग्णालयात येणाऱ्या  सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा देत त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे काम शिवसंग्रामच्या माध्यमातून होत आहे. 

जिल्हा रुग्णालयातील अनेक अडचणी संदर्भात थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गिते साहेब व  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड  यांना फोन करून या कोवीड पेशंट संदर्भात येणाऱ्या अडचणीची माहीती देण्यात येत आहे,  सबंधित यंत्रणेला दक्ष राहुन तात्काळ त्या अडचणी सोडवून रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून करून घेण्यात येत आहे गेल्या तीन दिवसांत २० ते २५ रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.गेल्या तीन दिवसात शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत डोरले व त्यांचे सहकारी शिवसंग्राम मावळे अहोरात्र कोवीड पेशंटला बेड मिळवून देण्यापासून ते अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत  झटत आहेत. शिवसंग्रामने आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्व स्तरावरून सामान्य रुग्णांना वेळोवेळी मदतीचा हात  दिलेला आहे. गेल्या दोन महिन्यात शिवसंग्रामच्या वतीने  साधारणतः 250 गरजू रुग्णांना ब्लड कार्डच्या माध्यमातून मदत केलेली आहे. 

       प्रशासनाकडून अथवा आरोग्य यंत्रणेकडून सर्वसामान्य रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ शिवसंग्राम कार्यालयाशी किंवा शिवसंग्राम हेल्थ लाईनशी 70570 10405  (प्रशांत डोरले)  96576 60857  (शकील खान) या क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन शिवसंग्राम चे युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी केले आहे.


No comments