Breaking News

संदीप जाधव व कुटुंबीयांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता


ॲड. सुविध कुलकर्णी व संदीप मयुरे यांचा उत्कृष्ट युक्तिवाद

जालना :  जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी सय्यद शफिक यांच्या खुनातील मुख्य आरोपी संदीप जाधव सह आरोपी बबन काळे व श्रवण काळे यांची आज खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून सर्व साक्षीदारांनी आरोपींच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असताना कायद्याच्या कसोटीवर हा खटला टिकला नाही, म्हणून सर्व आरोपींची या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

सविस्तर वृत्त असे की 16 जून 2019 च्या मध्यरात्री दीड वाजता आरोपी संदीप जाधव व इतरांनी आरोपी संदीप जाधव यांच्या आईला छेडछाड करून शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी मयत सय्यद शफिक यांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने व लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत मृत सय्यद शफीक यांच्या आई  यांना देखील जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान सय्यद शफिक यांचा मृत्यू 18 जून रोजी झाला. 

भा.द.वि. 302, 143, 148, 149 प्रमाणे सदर बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक व्ही.आर. जाधव यांनी उत्कृष्टपणे केला होता. सदरील प्रकरणांमध्ये मयताची आई, मयताचा भाऊ फिर्यादी यांच्यासह वडील व शेजारी हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयामध्ये सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीच्या विरुद्ध स्पष्टपणे साक्ष दिलेली होती. असे असताना देखील कायद्याच्या कसोटीवर शवविच्छेदन करणारे डॉक्टर व मयतावर उपचार करणारे डॉक्टर यांच्या उलटतपासणी मध्ये सदरील प्रकरण कायद्याच्या कसोटीवर टिकले नाही. सदरील प्रकरणांमध्ये आरोपींच्या वतीने ॲड सुविध कुलकर्णी, ॲड संदीप मयुरे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड. विशाल कदम यांनी सहाय्य केले.

No comments