Breaking News

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग


गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील एका गावात शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. 


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सारुळ येथे माहेरी राहत असलेले महिला दि. २० एप्रिल रोजी शेतात करण्यासाठी गेली असता धर्मा नागरगोजे नावाच्या इसमाने तिचा वाईट येणे डावा हात धरून विनयभंग केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात गु र।नं १९८/२०२१ भा दं वि ३५४, ३५४ (अ), ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी सानप हे करीत आहेत.

No comments