Breaking News

शिवसेनेच्या वाघिणीने डरकाळी फोडताच महावितरण नमले


विजबील भरण्यात ग्राहकांना काही टप्प्याची मुभा
; अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मागणीला यश

बीड : जिल्हा महावितरण विभागाकडून नागरिकांची विज कनेक्शन कट करून सर्रासपणे अडमुठ्या धोरणाने वसूली केली जात होती. याविरूद्ध शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आवाज आवाज उठवताच महाविरण विभागाने नमते घेत विजबील भरणा करण्यात सक्ती न करत नागरिकांना काही टप्प्याची मुभा देण्यात आली आहे.

गेल्यावर्षीचा संपूर्ण कालखंड कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गेल्याने सर्वांच्या जीवनाची घडी विस्कटली गेली आहे. त्यानंतर मागील काही काळात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी आल्याने सर्व नागरिक बाहेर पडत आपल्या व्यवसायत तसेच कामधंद्याला लागले होते. 

पंरतू मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन केले. संपूर्ण काळ लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्याना आपल्या उदनिर्वाह भागविणे आवघड झाले होते. यामध्ये बीड जिल्हा महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांकडून विज बील भरणाची सक्ती करत नागरिकांची अडवणुक केली जात होती. यावेळी शहरातील काही नागरिकांनी शिवसेना महिला प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांची भेट घेत सर्व कैफियत त्यांच्यासमोर मांडली असता तात्काळ येथील अधीक्षक अभियंता फोन करत विज बील भरण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. आणि प्रसिद्ध पत्रकातून आवाहन केले. मागील संपूर्ण वर्ष कोरोनाचा थैमान असल्याने अनेकांचे हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते.

 यातून कसेबसे सावरत आता कुठी थारा लागत असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेकांना जगणे  जिकरिचे असतांना महावितरण विभागाकडून विद्यूत कनेक्शन कट करत वसूलीचा तगादा लावण्यात येत होते. याविरुद्ध जिल्हाधिकारी यांना निवेदन देत. प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून महावितरण विभागाला वसूलीचा तगादा खपवून घेतला जाणार नसल्याचे आवाहन केले होते.  यावेळी अधीक्षक अभियंतांनी पत्रक काढत जिल्ह्यातील नागरिकांनी दोन ते तीन टप्प्यात विज बीलाचा भरणा करावा असे आवाहन केले असून शिवसेनेच्या वाघिणीने नागरिकांच्या बाजूने आवाज उठविताच महाविरण नमले असल्याचे दिसून आले असून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मागणीला यश आले आहे. 

ग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावे -अधीक्षक अभियंता 

महावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनीवरही अतिरिक्त आर्थिक भार डणार नाही असे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. 

No comments