Breaking News

शिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट


रूग्णाच्या जेवण व पाणी व्यवस्थेची केली पाहणी 

गौतम बचुटे केज 

केज तालुक्यात दररोज कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने पिसेगाव कोव्हिड सेंटर व शारदा इग्लिश स्कुल येथे कोरोना रूग्णाची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. परंतु  काही रुग्णांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक यांना फोन करून कोव्हीड सेंटर मध्ये जेवणाची व पाणी व्यवस्थेची सोय होत नसल्याची तक्रार केली होती. 

त्या करिता दि. १८ एप्रिल रविवार रोजी जिल्हा प्रमुख सचिन मुळुक व केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी शारदा इग्लिश स्कुल व डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पिसेगाव येथील कोव्हिड सेंटरला भेट देऊन  रूग्णाची दुपारी ३:०० वाजता विचारपुस केली. या वेळी  रूग्णांना आंघोळीला पाणी नाही. तसेच दररोज दुपारी ३:०० वाजले तरी जेवण मिळत नाही. अशी माहीती समोर आली. त्यावेळी जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक यांनी  जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार केज,    जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकिय  अधिक्षक केज यांना  फोन करून माहिती देऊन तक्रार केली. तसेच जेवण पुरवठा करत असलेल्या ठेकेदाराची भेट घेऊन त्याला धारेवर धरले. या वेळी त्यांने कामगार मिळत नसल्याचे उत्तर दिले.  या मुळे जर कोव्हिड सेंटर मधील रूग्णाची हेळसांड प्रशासनाने थांबवली नाही; तर  शिवसेना स्टाईलने धडा शिकवू. असा ईशारा जिल्हा प्रमुख सचिन भैय्या मुळूक यांनी दिला आहे.  यावेळी  विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख अनिल ठोंबरे, युवासेना शहर प्रमुख तात्या रोडे, वैद्यकीय कक्षाचे भारत तुपारे डॉ. चाटे, डॉ. शिंदे उपस्थित होते.

No comments