Breaking News

मुडदे पडल्यावर जिल्हाप्रशासन औषध उपलब्ध करणार आहे का? : राजेंद्र आमटे


जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार, रेमेडिसीविर चा तुटवडा

बीड :  कोरोनाचा प्रभाव वाढत असताना कोरोनावर प्रभावी काम करणारा डोस रेमेडिसीविर या औषधाचा जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. हॉस्पिटल वाले म्हणतात सिव्हिल सर्जन कडे जा. सिव्हिल सर्जन म्हणतात डोईफोडे कडे जा. डोईफोडे म्हणतात लॉटस ला जा नातेवाईक सकाळ पासून फॅक्त चकरा माराव्यात का? आज जिल्ह्यात किती रेमेडिसीविर औषधाचा डोस आवश्यक आहे उद्या किती गरजेचा आहे याचा विचार करून पाठपुरावा करण्याचे काम जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचे आहे परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा ,ऍन औषध प्रशासन या यंत्रणेचा एकमेकांशी  समन्वयच्या अभावामुळे आज जिल्ह्यामध्ये रुग्णालयात रुग्णांना रेमेडिसीविर या औषधाच्या डोसाचा मिळवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात, इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये चकरा माराव्या लागत आहेत.

      काही खाजगी मेडिकल मध्ये औषधे उपलब्ध असताना रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जात नाहीत खाजगी मेडिकलची झडती घेऊन या औषधाचा साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या मेडिकल परवाना धारकांचे परवाने रद्द करावेत. 

       जिल्हाप्रशासनाने रुग्णांनाची व रुग्णाच्या नातेवाईकांची हेळसांड होणार नाही औषधाच्या अभावी एखाद्या निष्पाप जीवाचा बाळी जाणार नाही याची दक्षता घ्यावी तात्काळ जास्तीत जास्त पाठपुरावा करून औषध उपलब्ध करावेत असे पत्रक शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने देण्यात येत आहे. 

No comments