Breaking News

केज तालुक्यातील बोरगावातील खून प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील बोरगाव येथे सख्या भावाने मित्राच्या मदतीने बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. केज पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना दि. ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथे दिनांक २१ एप्रिल बुधवार रोजी विधवा शितल लक्ष्मण चौधरी वय २८ वर्ष या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून तिचा सख्खा भाऊ दिनकर उर्फ दिन गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिनकर धनंजय वळेकर या दोघांनी ती झोपलेली असताना लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केला होता. या प्रकरणी मयत शितल हिचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गु.र.नं. १९७/२०२१ भा.दं.वि. ३०२ आणि ३४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.


दरम्यान खून करताच दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्या नंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. केज पोलिसांनी त्यांच्या मोबाईलच्या सिडीआर वरून तपास घेऊन त्यांना दि. २६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथून ताब्यात घेतले.  अटक करताच पोलिसांनी आरोपींना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयाने दि. ३० एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करीत आहेत.

 

No comments