Breaking News

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे


रुग्णांसाठी देवदुत आहात देवदुतासारखे वागा..

आष्टी : आपणही आपल्या कामाबाबत टोलवाटोलवी करु नये कोविड रुग्ण आपणाकडे  देवदूत म्हणून पाहत आहेत आपण देवदूत म्हणून काम करावे तुम्हांला लागेल ते साहित्य मी माझ्या स्तरावर उपलब्ध करून देतो परंतु कोविड रुग्णांचे सेवा व आरोग्य सुविधेअभावी हाल होऊन देऊ नका, जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करा तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या त्यासाठी प्रशासन यंत्रणा व आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत. आरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व  अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार आसे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. 

   आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर येथे आ.बाळासाहेब आजबे काका यांच्या अध्यक्षतेखाली कोवीड १९ संदर्भात सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी  यांची बैठक घेण्यात आली  यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी  राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ, राहुल टेकाडे, डॉ.शरद मोहरकर यांच्यासह सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


       यावेळी आ. बाळासाहेब आजबे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या त्या  प्राधान्याने  सोडवतो असे सांगत,  आरोग्य कर्मचारी व या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचार्‍यांच्या अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडवणार असून आपणास येणाऱ्या अडचणी वेळोवेळी आमच्या कानावर घालत चला कोवीड बरोबरच कर्मचाऱ्यांचे आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे कारण कर्मचारी असतील तरच आपल्याला हव्या तशा आरोग्य सेवा देता येतील हे लक्षात घेतले पाहिजे. काम करत असताना आपल्या कामात कोणीही हलगर्जीपणा करू नये कारण ही वेळ एकमेकावर टोलवाटोलवी करण्याची नसून सर्वसामान्य जनतेच्या जीवन मरणाची आहे सर्वांनी अंग झटकून कामाला लागावे प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी ओळखून आपले काम इमानेइतबारे केल्यास आपण सर्व मिळून नक्कीच या संकटातून बाहेर पडू यासाठी आपल्याला सर्वांना मिळून काम करण्याची गरज असल्याचे शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रोजगार हमी समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप सुंब्रे,सरपंच अशोक पोकळे, नाजिम शेख , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

No comments