Breaking News

भीम जयंती साजरी करायला खरेदीसाठी दोन दिवस आणि जयंतीदिनी अभिवादनासाठी फूल-हाराची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी- गणेश वाघमारे


बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण  देशभरासह महाराष्ट्रभर शहर पातळी, गावपातळीवर मोठ्या उत्साहात साजरी होत असते. त्या अनुषंगाने बीड चे  जिल्हाधिकारी रवींद्र जगताप  यांनी 14 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यासाठी दोन दिवस संपूर्ण मार्केट चालू करून जयंती साधेपणाने साजरी करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर अशी मागणी आंबेडकरवादी अनुयायांच्या वतीने नगरसेवक गणेश वाघमारे यांनी केली आहे.  छोट्या-मोठ्या व्यापार करण्याची संधी द्यावी त्यामध्ये कपडा मार्केट, रेडीमेड ड्रेसेस, अभिवादन करण्यासाठी फूल हाराचे दुकाने कमीत कमी दोन दिवस उघडे करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी द्यावी अशी मागणी सर्व समाज बांधवांच्या वतीने नगरसेवक गणेश वाघमारे यांनी केली आहे.

शासनाचे सर्व नियम पाळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे घराघरात उत्साहचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, अगोदर मिठाई, चिवडा व इतर पदार्थांची आवश्यकता असते . त्यामुळे  व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आनंदात भीम जयंती साजरी करता येईल. 

No comments