Breaking News

आ. बाळासाहेब आजबे काका मित्रमंडळाने कोविड रुग्णांसाठी दिली मायेची सावली

के. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी तालुक्यामध्ये कोरणा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नाने 60 ICU बेडची व्यवस्था करण्यात आली आहे . या ट्रामा केअर सेंटर च्या इमारती मध्ये मोकळ्या पॅसेजमध्ये कोविड रुग्णांसाठी बेडची वाढीव बेडची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे, परंतु या इमारतीच्या मधील काही भाग उघडा असल्याने दिवसा पेशंटला उन्हाचा सामना करावा लागत होता.

आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी सावलीची व्यवस्था केली त्यामुळे या ठिकाणी वीस ते पंचवीस जास्तीचे बेड लावता येणार आहेत,आ. बाळासाहेब आजबे सतत आष्टी व इतर कोविड सेंटरमध्ये लक्ष देऊन आहेत, आष्टी येथील कर्तव्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक कार्यकर्ते यांना आष्टी ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे रुग्णांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सुचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कर्तव्य प्रतिष्ठान व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाचे तरुण कार्यकर्ते रात्रंदिवस याठिकाणी उपस्थित राहत असून ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची सोयी ते स्वतः जातीने लक्ष देऊन करत आहेत त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईकमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. 


गेल्या एक महिन्यापासून कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप भाऊ सुंबरे,शहराध्यक्ष नाझीमभाई शेख, अशोक पोकळे, राजेंद्र जरांगे, सतीष सोले,व ईतर त्यांचे सर्व सहकारी कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांना मदत व्हावी यासाठी रात्रंदिवस हे सामाजिक कार्य आरोग्य दूत म्हणून करत आहेत.

No comments