Breaking News

सावता परिषद आयोजित विचार पर्व व्याख्यानमाला विचाराची पर्वणी ठरेल-कल्याण आखाडे


बीड :  फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी सावता परिषदेच्या वतीने आयोजित केलेली विचार पर्व व्याख्यानमाला खऱ्या अर्थाने विचाराची पर्वणी ठरेल असे मत व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणुन बोलताना सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी व्यक्त केले.

   


    सावता परिषदेच्या वतीने कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे दि.११ ते १४ एप्रिल दरम्यान फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की फुले,शाहु, आंबेडकर यांच्या विचार कार्याचा गाढा व चिकित्सक अभ्यास असणारे ख्यातनाम व्याख्याते या व्याख्यानमालेत संबोधित करणार आहेत. 

यात पुरोगामी विचारवंत व नामांकित साहित्यिक प्रा. प्रल्हाद लुलेकर, जेष्ट कम्युनिस्ट नेते कॉ. राजन क्षीरसागर, ख्यातनाम व प्रभावशाली व्याख्याते  प्रा. आर.एस.यादव,विद्रोही व परिवर्तनवादी कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे हे फुले,शाहु, आंबेडकर यांचे शिक्षण, शेती, संस्कृती,महिला विषयक आदी विषयावर प्रबोधन करणार असल्यामुळे बहुजन हिताची ठरणारी आहे.महापुरुषांनी दाखवून दिलेल्या आदर्श मार्गावरून वाटचाल करावी असे सांगुन या व्याख्यानमालेस सर्वांनी भरभरून प्रतिसाद दयावा असे आवाहन त्यांनी केले.  या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रस्ताविक सावता परिषदेचे प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी तर सुत्रसंचालन प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे यांनी केले. 

No comments