Breaking News

अशोक चक्रांकीत निळा ध्वजात बदल करून झेंडा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा : बसपाचे ॲड. अमोल डोंगरे यांची मागणी


माजलगाव :  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंतीची भारतभरचं नव्हे तर जगभर आनंदी व उत्साही वातावरणात गावो - गावी उत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे. 

  या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायी अशोक चक्रांकीत निळे झेंडे आपल्या घरावर लावतात तसेच प्रेरणास्थळी ध्वजारोहण करतात. बाजारात निळे झेंडे व पताका विक्रीस आले आहेत. पण झेंडा छपाई करणारे कारखानदार व व्यापारी आणि विक्रते यांनी महामान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाची अस्मिता व एकात्मचे प्रतीक म्हणून सबंध वंचित घटकास अशोक चक्रांकित निळा ध्वज दिला. 

त्या मुळ अशोक चक्रांतित निळ्या ध्वजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात बदल करून सामान्यांची वैचारीक दिशाभूल करून त्यांना उद्देशापासुन भटकवून मुळ प्रतिकाचे महत्व कमी करुन लूप्त करण्याचे षडयंत्र या पुरोगामी महाराष्ट्रात चालू आहे.या विरोधात आज दिनांकः १२ एप्रिल २०२१ रोजी माजलगाव येथील तहसिलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी,माजलगाव यांना बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष अँड. अमोल डोंगरे यांनी निवेदन दिले. व झेंडे छपाई कारखानदार, व्यापारी व विक्रते यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत व यापुढे मुळ अशोक चक्रांकीत असलेले झेंडे विक्री करावेत आणि बदल केलेले झेंड्यावर बंदी आणावी अन्यथा दिनांकः-१४ एप्रिल २०२१ रोजी आपल्या कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा अँड. अमोल डोंगरे यांनी दिला.

No comments