Breaking News

बीडच्या जयंत मंकाळेच्या जिद्दीची प्रेरणा युवकांनी घ्यावी-पप्पु कागदेअंधत्वावर मात करून तो झाला कलेक्टर....

बीड :  जग पाहणार्‍या डोळ्यांना अनुवंशिक आजारामुळे कायमचे अंधत्व आले. असे असले तरी त्यावर खचून न जाता स्वतःला सिध्द करून बीडचा युवक कलेक्टर झाला आहे. ही बाब नक्कीच गौरवाची आहे. त्यामुळे युवकांनी जयंत किशोर मंकाळे यांच्या जिद्दीची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी व्यक्त केले. 

बीड येथील रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात जयंत मंकाळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पप्पु कागदे बोलत होते. यावेळी राजू जोगदंड, अविनाश जोगदंड, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.

सत्कारावेळी पप्पु कागदे म्हणाले की, जयंत मंकाळे यांचे यश  युवकांसाठी प्रेरणादायी आहे. बीड येथे शिक्षण घेत असताना अनुवंशिकतेमुळे डोळ्यांची दृष्टी गेली. परंतू कलेक्टर होण्याची जिद्द   आणि अभ्यासाचे कठोर श्रम आज कलेक्टर पदापर्यंत जावून पोहचले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 143 रँक मिळवून बीडचा अंध युवक कलेक्टर झाला ही गोष्ट कौतूकाची असून युवकांमध्ये उर्जा निर्माण करणारी आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असताना प्रचंड आत्मविश्वास अंगी असला पाहिजे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी स्वत:शी प्रामाणिकपणा ठेवून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना अपयश आले म्हणून खचून जावू नका, पून्हा तेढ्याच उमेद्दीने तयारीला लागा. कारण याच खडतर प्रवासातून जयंत मंकाळे या युवकासारखा एक दिवस तुमच्या आयुष्यात असा नक्कीच येईल की, तुम्ही यशाची गोड फळे चाखल्याशिवाय राहणार नाहीत.असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी व्यक्त केले.

No comments