Breaking News

सरपंचांनी दिला पाण्यासाठी जल समाधी आंदोलनाचा इशारा


 

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथिल पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चाटगाव तळ्यातील पाणी उपसा करणाऱ्या मोटारीवर तात्काळ कारवाई करून पाणी उपसा बंद करावे यासाठी सरपंचांनी घेतला जल समाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दि. 8 /3/ 2021 रोजी तहसीलदार धारूर यांच्याकडे लेखी  निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते की, दिंद्रुड गावाला चाटगाव तळ्यातील पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. या तळ्यातील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी रात्र दिवस पाणी उपसा करून शेतीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे गावाला पाणी भीषण  टंचाई निर्माण झाली आहे. Jai Bharat friends

असेच जर पाणी उपसा केला तर पुर्ण गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. सध्या तळ्यातील पाणी खुपच कमी झालेले आहे.  तहसीलदार धारूर  यांनी एक महीणा झाले तरी निवेदनाची दखल घेतली नाही. तरी 27 /4 /2021 पर्यंत चाटगाव तळ्यातील पाणी उपसा करणाऱ्या मोटारीवर कारवाई करून जप्त करण्यात याव्यात जर जप्त नाही केल्यातर दि.28 /4/ 201 रोजी सकाळी 10 :00 वाजत  नाईलाजाने ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सह चाटगाव तळ्यात लोकशाही मार्गाने जल समाधी आंदोलन  बिगर पाण्याचे मरण्या पेक्षा जल समाधी करून पाण्यात मेलेले बरे आसा ईशारा दिंद्रुड ग्रामपंचायतचे सरपंच अजय दिलीप कोमटवार यांनी लेखी निवेदनाद्वारे मा.  जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद बीड यांना दिला आहे.

No comments