Breaking News

केवड येथे विहिरीचे पाणी दूषित केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल


गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यातील केवड येथे एका शेतकऱ्याच्या पाण्याच्या विहिरीत रसायन टाकून ते दूषित केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केवड ता. केज येथील बाळासाहेब पटाईत यांनी पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या  विहिरीत खोदली आहे. बाळासाहेब पटाईत हे दि १२ एप्रिल रोजी लातूर येथे गेले होते ते परत आल्या नंतर दि १३ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वा ते शेतात गेले असता त्यांनी विहिरीत पाहिले असता विहिरीतील पाणी लालसर आणि पिवळे झाले असल्याचे निदर्शनास आले. या बाबत विहिरीवर कोण आले होते काय याची त्यांची पत्नी अंजना हिस विचारले असता तिने ती शेतात आली नसल्याचे सांगितले तसेच ही माहिती त्यांनी पोलीस पाटील उद्धव शिंदे यांना दिली.

दरम्यान बाळासाहेब पटाईत यांनी या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध इच्छापूर्वक पाणी दूषित करून घाण केल्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला गु र नं १८९/२०२१ भा दं वि २७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. 

No comments