Breaking News

कडा शहरामध्ये नागरिक व व्यापाऱ्यांनी पाळला कडक विकेंड लाॅकडाऊन


शेख कासम । कडा

आष्टी तालुक्यातील कडा शहरामधील नागरिकांचा आणी व्यापारी बांधवाचा शनिवार व रविवार दोन दिवसीय कोरोना रोखण्यासाठी राज्यशासनाच्या दिलेल्या आदेशाचे पालन करत विकेंड लाॅकडाऊनला कडा शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 

आष्टीचे पोलिस निरक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली कडा पोलिस चाैकीचे एपीआय मोरे, तसेच पोलिस कर्मचारी गर्जे, दुधाळ, राख, नायकवाडे, मिसाळ, तसेच होमगार्ड धुमाळ, काळे, पारखे  ही पोलिस यंत्रणा कडा शहरामधील चाैका चाैकात, गल्ली बोळीत जाऊन सुचना देत गर्दी करु नका, तोंडाला मास्क बांधा तसेच विना मास्क घालून मोकाट फिरणार्‍यांना दंडूक्याचा धाक दाखवताच तोंडावरचा मास्क नाकावरती चढवतानी दिसत होती. दुसरी कडे काडा ग्रा. पं. चे सरपंच उपसरपंच ग्रा.पं सदस्य व कर्मचारी देखील कडा शहरामध्ये कडक लाॅकडाऊन विकेंड साठी प्रयत्नशील दिसत होती.

हमेशा गर्दी करुन गजबजणार्‍या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैका पासुन ते कडा कृ. उ. बाजार समिती पर्यंत सुकसुकाटीची झालर दिसत होती. यामध्ये महाविर गल्ली, सोनार गल्ली, देशमुख गल्ली, बाराभाई गल्ली, भाजी मंडई तसेच ग्रा. पं. समोरील स्टेशनरी, कापड दुकान, किराणा, मटन-चिकन शाॅप पुर्णत: बंद दिसत होती. तसे पाहेले तर पोलिस कर्मचार्‍यांच चोख मोर्चे बांधणी पोलिस निरक्षक सलिम चाऊस यांची दिसत होती.

No comments