Breaking News

कोरोना मुळे निधन झालेल्या परिवाराला दहा लाख सानुग्रह अनुदान द्या

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली मागणी


बीड  :  कोरोना मुळे निधन झालेल्या परिवाराला दहा लाख रूपये  सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

सध्या कोरोना मुळे आपल्या देशात व विशेषतः महाराष्ट्रात कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होत आहेत.कोरोना मूळे निधन होणाऱ्या मध्ये अनेक कुटुंब प्रमुखच आहेत. त्यांचे निधन झाल्या मुळे त्या परीवाराचे अतोनात नुकसान झाले आहे. ते परिवार सर्व बाजूने खचून जात आहेत. परिवाराचा खर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च असे भविष्यातील अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत व अपघात झाल्यास सरकार सानुग्रह अनुदान देवून त्या कुटुंबाला सावरते. कोरोना हे ही असेच संकट आहे. त्यामुळे कोरोना मुळे निधन झालेल्या व्यक्ती च्या परिवारा तात्काळ केंद्र व राज्य सरकार ने मिळून सानुग्रह अनुदान द्यावे व विस्कळीत झालेल्या परिवाराला आधार द्यावा. अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केलेली आहे .

No comments