Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


युवकांनी रक्तदान करण्याचे अजय सुरवसे यांनी केले आवाहन 
 

बीडभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी (दि.१४) रोजी करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी केले आहे. 

 कोरोनाच्या संख्येत राज्यात वाढ होऊ लागल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ब्रेक दि चेन आणि विकेंड लॉकडाऊन करून निर्बंध घातले आहेत. राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ला या कार्यात झोकून देण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी केले असून कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात रक्ताच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाला असून त्याकरिता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा, तालुकास्तरावर रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तसंकलन होण्याकरिता प्रयत्न करावेत,असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यानुसार बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे म्हणाले.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तरुणांनी 'रक्तदान म्हणजे जीवनदान' असे समजून राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित भव्य रक्तदान शिबीरामध्ये तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन श्री. सुरवसे यांनी करून शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात येणार असल्याचं आ. संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे म्हणालेत.

No comments