Breaking News

आष्टी येथील रुग्णालयामध्ये सी.टी.स्कॅन मशीनची व्यवस्था करा : शिवसंग्रामचे ज्ञानेश्वर चौधरी यांंची मागणी

 


आष्टी :  सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संपुर्ण महाराष्ट्रा बरोबरच बीड जिल्ह्यामध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्याच बरोबर आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय असुन या ठिकाणी लवकरच उपजिल्हा रुग्णालय अशी मान्यता मिळणार आहे. सध्या या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर युनिट सुरु असुन कोविड रुग्णांसाठी 60 बेड ऑक्सिजन व्यवस्थेसह सुरु झाल्याने गोरगरीब  रुग्णांची चांगली सोय होत आहे. 


सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे,लक्षणे दिसत नसली तरी अँटीजन टेस्ट आर.टी.पी.सी आर.टेस्टमुळे रुग्ण ओळखता येत आहेत मात्र सी.टी. स्कॅन मशीनची सोय नसल्यामुळे रुग्णांना अहमदनगर,अथवा बीड या ठिकाणी पाठवत आहेत त्याच बरोबर जामखेड याठिकाणी एक खाजगी सी टी स्कँन सेंटर चालु आहे त्या ठिकाणी रुग्णांची संख्या पाहता दिवसभर वेटिंग मध्ये रुग्णांना थांबावे लागत असुन त्या ठिकाणी दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत त्यामुळे ये-जा आणि खर्चीक बाबी मुळे रुग्ण आणि नातेवाईक यांची हेळसांड होत आहे बीड, पाटोदा, जामखेड, आष्टी, कडा चिंचोडी ते अहमदनगर पर्यंतच्या 150 किमी अंतरामध्ये कोणत्याही ठिकाणी शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत सी टी स्कॅनची सोय नाही. 

त्यामुळे ह्या सर्व गावांच्या परिसरातील मध्यवर्ती केंद्र म्हणुन सुसज्य असलेल्या ट्रामा केअर सेंटर ,ग्रामीण रुग्णालय आष्टी याठिकाणी सी टी स्कॅन मशीन बसवावी आणि गोर गरीब जनतेला रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा त्याचबरोबर नवनिर्वाचित सत्ताधारी  आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे की जी तुम्ही एका ठिकाणी 200 रुपयेची ताडपत्री टाकुन मायेची सावली म्हणुन पेपर मध्ये बातमी छापण्यापेक्षा सी टी स्कॅनची व्यवस्था करावी असे सर्वसामान्य जनतेला वाटते. आणि हा निधी कमी पडत आहे तर आमदार खासदार यांच्या विकास निधीतून, जिल्हा नियोजन विकास निधीतून अथवा माजी आमदार यांच्या पेन्शनमद्ये कपात करुन या साठी लागणारी रक्कम जमा करुन या मशीनची खरेदी करावी अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.


No comments