Breaking News

कोरोना रुग्णांची निंदा करू नका, त्यांना मानसिक आधार द्या सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांचे भावनिक आवाहन


बीड : गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या महाभयंकर विषाणुने जगभरासह देशाला मोठ्या संकटात आणले असून सध्याच्या परिस्थितीत तर कोरोना हा खूप झपाट्याने वाढल्याचे चित्र आपण बघतो आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचबरोबर मृत्यूचा आकडाही मन हेलावून टाकणारा आहे. कोणीही या रोगाला हलक्यावर घेणे चुकीचे आहे. आपण सुरक्षीत राहून दुसर्‍यांनाही सुरक्षीत ठेवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला की त्याला हिन वागणूक दिली जाते, त्याची निंदा केली जाते. अशा वागणुकीमुळे तो रुग्ण खूप खचून जात असून तो रोगाचा प्रतिकार नाही करू शकत. 

कोरोनाबाधित होणे हे त्याचे दुर्भाग्य नसून हे जगावरच आलेले संकट आहे. कोरोना होणे म्हणजे निंदा करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांना जर भेटण्यास आपण जावू शकत नसलो तर त्यांना किमान फोन लावून धीर देण्याचे तरी काम करावे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रतिकार शक्तीची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी रुग्णाला मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे अत्यावश्यक असून अशा परिस्थितीत कोणीही कोरोनाबाधित रुग्णाशी मानसिकरित्या त्याला दुर्बल न करता त्याला फोन लावून आधार द्यावा. जेेणे करून तो लवकरात लवकर बरा होईल, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक (दादा) ढोले पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वघारे केले आहे.


No comments