Breaking News

एका कोरोना योध्याचा केला दुसऱ्या कोरोना योद्ध्याने सत्कार !

गौतम बचुटे । केज 

कोरोनाच्या महामारीत डॉक्टर्स, पोलीस, सर्व आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे हे आपल्या जिवाची पर्वा न करता सामान्य नागरिकांच्या जिविताच्या रक्षणासाठी अहोरात्र लढत आहेत. याचा कुठेतरी सन्मान व्हायला हवा याच भावनेतून युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहीफळे यांनी डॉ. सुजित राऊत यांचा सत्कार केला. 

या बाबतची माहिती अशी की, कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असताना सर्व डॉक्टर्स, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, स्वच्छता विभाग, स्थानिक प्रशासन हे स्वतःच्या जिविताची किंवा कुटुंबाची काळजी न करता सामान्य जनतेसाठी औषधोपचार व शुश्रूषा कोरोना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

दरम्यान दिनांक २८ एप्रिल रोजी युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी कोरोनाच्या महामारीत रुग्णसेवा करणारे डॉ. सुजित राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. विशेष म्हणजे पोलीस आणि आरोग्य कर्मचारी हे फ्रन्टलाइन वर्कर असून; एका कोरोना योद्ध्याने दुसऱ्या कोरोना योद्ध्याचा सन्मान केला. याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या वेळी सोबत पोलिस कॉन्स्टेबल डोईफोडे, सोनवणे, म्हेत्रे, घोरपडे, बाळासाहेब ढाकणे, शेख, माने हे उपस्थित होते.

No comments