Breaking News

अंबानगरीत पर्यटनस्थळ सुरू करण्याची निसर्गप्रेमींची मागणी


अंबाजोगाईच्य डोंगरदऱ्यात अनेक सिनेमा, मालीका, आल्मबमचे झाले चित्रण, स्थानीकांना मिळू शकतो रोजगार 
 

शिवाजी भोसले । अंबाजोगाई

सांस्कृतिक,ऐतिहासिक व शैक्षणिक शहर म्हणून अंबाजोगाईचे नाव राज्यात लौकिक आहे.शहराच्या परिसरात आकर्षक निसर्गसंपदा असून येथे पर्यटनस्थळ सुरु करण्याची मागणी निसर्गप्रेमी नागरीक मागील तीस वर्षापासून करीत आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सदस्यांनी आतापर्यटन केंद्राच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याने मागणीला बळ मिळाले आहे.


महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र-अंबाजोगाई व मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थानिक शाखा यांच्या वतीने ‘पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम’ काही दिवसांपूर्वी यशवंत सभागृह घेण्यात आला.अंबाजोगाई पर्यटन केंद्राविषयी चर्चा झाली.त्यामुळे पर्यटनस्थळाच्या मागणीला बळ मिळाले आहे.पर्यटन प्रशिक्षक मनोज हडवळे (पर्यटन संचालनालय )यांनी येथे येऊन नागरिकांना मार्गदर्शनही केले.डॉ नरेंद्र काळे यांनी पर्यटन केंद्राची मागणी खासदार सुप्रिया सुळे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदने देऊन केलेली आहे.

अंबाजोगाई व परिसर हा निसर्गरम्य,पशु पक्ष्याच्या व झाडांच्या विविध प्रजातीने समृद्ध परिसर आहे. त्याच बरोबर लेणी,विविध देवी देवतांचे आनेक मंदीरे,बारव,शिलालेख, निजामकालीन बुरुज,ऐतिहासिक समाध, बाराखांबी व धार्मिक वास्तुचा खजाना शहरात आहे. पर्यटनाच्या वाढीव दृष्टीने अंबाजोगाई शहराला मोठी संधी आहे.त्यामुळे पुढील काळात अंबाजोगाईचा पर्यटन केंद्र म्हणुन विकास होण्यासाठी व आजुबाजुच्या ग्रामीण भागात कृषी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्याचीही खरी गरज आसल्याचे मत निसर्गप्रेमी करत आहेत. 

सर्व निसर्ग प्रेमी, पक्षी प्रेमी व पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणारे युवक ,कलाकार, समाजसेवक  यांच्याशी विचारविनिमय करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्राचे अध्यक्ष अनिकेत लोहिया,उपाध्यक्ष दगडु लोमटे,सचिव डॉ.नरेंद्र काळे,माजी आमदार उषा दराडे ,अमर हबीब,अभिजित जोंधळे, मराठवाडा जनता विकास परिषद स्थानिक शाखाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,सचिव प्रा.सोनवळकर रमेश,संतराम कऱ्हाड, प्रा.डॉ.डी.एच.थोरात, सुरेंद्र खेडगीकर,जनार्दन मुंडे,सुहास काटे,व्यंकटराव बेंबडे,मधुकरराव बाभुळगावकर,प्रमोद देखणे यांनी परिसरातील निसर्गरम्य देखाव्याच्या माहितीवर चर्चा केली.पर्यटन विषयी माहिती छायाचित्रासह संग्रहित केली आहे. त्यांचे पर्यटन क्षेत्र पात्रिका या पुस्तकाचे प्रकशन मान्यवरांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले आहे.या मागणीला नागरिकांचा वाढता पाठिंबा आहे.लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी,नगरपालिका,सामाजिक संस्था व नागरिकांनी एकत्रित येऊन मागणी करण्याची खरी गरज आहे.आजही निसर्गप्रेमी कालांतराने येथे पर्यटन केंद्र सुरू होईल आणि पर्यटकांची वर्दळही वाढण्याची अपेक्षा आहे.

 बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांचे प्रसिध्द समाधी मंदिर, डोंगरकपारीत बुट्टेनाथ, निसर्गरम्य परिसरात महामृत्यूंजय मंदिर,सर्वज्ञ दासोपंत यांची समाधी, रेणूकादेवी मंदिर, कोरीव दगडी मूर्त्यांचा शिवलेणे असलेलाहत्ती खाना, आकर्षक मूर्ती असलेले संकलेश्वर, आमलेश्वर, खालेश्वर मंदिर, जैन लेण्या, ग्रामदेवता योगेश्वरी देवी त्याच्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी नागनाथ मंदिर आहे. भरपूर हिरवी झाडी -जंगलाने व्यापलेल्या निसर्गरम्य परिसरातून खळखळून वहानारी जयवंतील नदि व डोंगराच्या कड्यावरुण वाहाणारे आकर्षक धबधबे.निसर्गाच्या सानिध्यात आढळणारे हरिण,काळविट, ससे,माकडे,मोर,घोरपड,विविध रंगाचे सरडे, पोपट, सुतार पक्षी,धिवरपक्षी व आसे आनेक इतर दुर्मीळ पक्षीही या परिसरात दिसुन येतात.

पर्यटनस्थळ सुरू केले तर बोरूळ तलावा शेजारी रम्य परिसरातील काशी विश्वनाथ मंदि बोटिंगसाठी उपयुक्त आहे.दोन डोंगरादरम्यान रोपवे प्रकल्प उभाराहू शकतो अश्या डोंगरकडा सुध्दा आहेत.अंबानगरीत पर्यटनस्थळ सुरू केले तर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.परंतु निसर्गरम्य परिसरात चांगले रस्ते,पूल,पर्यटकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्थाही करणे गरजेचे आहे.त्यामुळे पर्यटकांची कुचंबना होनारा नाही.  पालकमंत्री,लोकप्रतिनिधीं,नगरपालीका यांनी प्रयत्न केले तरच अंबाजोगाईच्या पर्यटन केंद्र म्हणून उद्दयास येणार आहे.पर्यटन केंद्र उभारणीचे अश्वासने यापुर्वी अनेकांनी दिली आहेत.परंतु ते प्रत्यक्षात ते केव्हा सुरु होते याकडे अंबानगरी परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांचे डोळे लागले आहेत.


No comments