Breaking News

कापरेवाडी मारहाण प्रकरण : तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील कापरेवाडी येथील एका तरुणाला लोखंडी गजाने मारहाण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केलेल्या प्रकरणातील तीन आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री फाट्यावरील कमानी जवळ दि.२९ मार्च सोमवार रोजी दुपारी २:०० वा. सोमनाथ जनार्धन कापरे यास अशी माहिती मिळाली होती की, त्याच्या भाऊ अण्णासाहेब कापरे यास अतुल देशमुख, रवींद्र भोसले व हरी या तिघांनी दारू पी; नाहीतर आम्हाला दारू पाज. या कारणा वरून मारहाण झाल्याचे समजले होते. 

त्या वरून सोमनाथ कापरे हा हनुमंत पिंप्री फाट्यावरील कमानी जवळ गेला असता त्यांना अतुल देशमुख, रवींद्र भोसले व हरी यास त्याच्या भावाला मारहाण का केली ? असे विचारले असता अतुल अंकुशराव देशमुख याने सोमनाथ कापरे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच जेसीबी चालक हरी याने काठीने मारून हात फ्रॅक्चर केला. रवींद्र भोसले याने सोमनाथ कापरे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज डोक्यात मारून गंभीर इजा केली होती. तसेच हे तिघे सोमनाथ कापरे यास म्हणाले की, तू त्यांचे वाळूचे ट्रॅक्टर व जेसीबी कशी काय अडवितोस? असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी सोमनाथ कापरे यांच्या फिर्यादी वरून दि. २९ मार्च रोजी केज पोलीस स्टेशनला अतुल देशमुख, रवी भोसले व हरी सर्व रा. वरपगाव ता. केज यांच्या विरुद्ध गु.र.नं. १४१/२०२१ भा.दं.वि. ३२६, ३२५, ३२३,  ५०४, ५०६ आणि वैद्यकीय अहवालानुसार भा. दं. वि. ३०७ या वाढीव कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तिन्ही आरोपींना दि.२७ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.



No comments