Breaking News

गोदावरीपात्रात वाळू घाटांवर अवैध उपसा महसूल, पोलीस, आरटीओंचे संगनमत; आमदार संदीप क्षीरसागर यांची तक्रार


एकाच इनव्हाईसवर एकच ट्रक भरते अनेक वेळा वाळु

तातडीने कारवाई करा, लेखी स्वरुपात माहिती द्या : आ. क्षीरसागरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 
बीड :  जिल्ह्यातील सुरळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी ता. गेवराई आडुळ घाट,गव्हाणथडी, ता.माजलगाव येथे वाळू घाट सुरू केले आहेत, परंतु सुरुळेगावं पांचाळेशॉवर व गोदावरी नदीपात्रात इतर वाळू घाटाच्या ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे.वाळु लिलाव घाटाची ठरवून दिलेली जागा सोडून इतरत्र ठिकाणी शासनाला कसल्याही प्रकारचा महसूल न भरता  य सर्रास अवैध वाळु उपसा होत असून तो उपसा तात्काळ थांबवावा आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे. या अवैध वाळु उपश्यामुळे या भागातल्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होत असल्याचे त्यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यातील सुळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी, आडुळघाट, गव्हाणथडी या ठिकाणचा लिलाव होऊन वाळु उपश्याचे घाट सुरू करण्यात आले आहेत. मात्र या वाळु घाटाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. एकच इनव्हाईसवर दिवसभरामध्ये एकच ट्रक अनेकदा वाळु भरून घेतले. कोल्हापूर, उस्मानाबाद येथे वाळु खाली करण्याचे इन्व्हाईसद्वारे बीड जिल्ह्यात वाळु खाली करते. सदर ट्रक टिप्परमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरून अवैधरित्या वाळुची वाहतूक केली जाते. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. वाळु लिलाव घाटाची ठरवून दिलेली जागा सोडून इतरत्र ठिकाणी शासनाला कसल्याही प्रकारचा महसूल न भरता अवैधरित्या वाळुचा उपसा रात्री के्रनच्या साहाय्याने सर्रासपणे सुरू आहे. या अवैध वाळु उपश्याच्या वाहतुकीमुळे रस्तेही मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. या अवैध वाळु वाहतुकीच्या प्रकाराला महसूल, पोलीस, आरटीओ विभागाचे संपुर्ण दुर्लक्ष असून त्यांच्या संगनमताने अवैध वाळु वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, असं म्हणत आ. क्षीरसागरांनी या अगोदर जिल्हाधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे याची माहिती दिल्याचे म्हटले आहे. माहिती देऊनही हा अवैध वाळु उपसा अद्याप थांबलेला नाही. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदरचा प्रकार तात्काळ थांबवून दोषींवर तातडीने कारवाई करावी, व त्याची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशा आशयाचे पत्र आ.क्षीरसागरांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना दिले आहे. 

No comments