Breaking News

जिल्हाधिकारी साहेब रेमडेसिवीरच्या नावाखाली चाललेला काळा बाजार थांबवा - गणेश बजगुडे पाटील


बीड :  जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच खाजगी रुग्णालयातील रुग्णांची रेमडेसिविर या इंजेक्शनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मागील काही दिवस बीड शहरातील खाजगी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना अगदी सहजपणे १४०० रुपयात रेमडेसिविर हे इंजेक्शन उपलब्ध होत होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून याचा प्रचंड मोठा तुटवडा निर्माण केला जात आहे व १४०० रुपयांचे हे इंजेक्शन ५४०० रुपयात मध्ये विकण्याचा महाप्रताप काही मंडळींनी केला आहे. आगोदरच लॉकडाऊनमुळे बीडकर प्रचंड अडचणीला तोंड देत असताना इंजेक्शनच्या नावाखाली त्यांची प्रचंड लूट व मानसिक त्रास दिला जात आहे. 

       माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण कर्तव्यदक्ष आहात व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत आपल्याकडे विशेष आधिकार देखील आहेत. म्हणून आपण याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देवून सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करूनच आपण ठरवुन दिलेल्या मेडिकल दुकानातून अगदी सहज १४०० रुपयात रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे व सध्या चालू आसलेला रेमडेसिविरचा काळा बाजार थांबवावा असे आवाहन शिवक्रांती संघटनेच्या वतीने शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.

No comments