Breaking News

सीना धरणातून कालव्याद्वारे लवकरच बंधारे भरण्यात येणार : आ. बाळासाहेब आजबे


 के. के. निकाळजे । आष्टी

 सीना धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल् लक असल्याने व पावसाळा जवळ येत असल्याने या धरणातील पाण्याने डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडून बंधारे,नाले भरून घेण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करुन येत्या दोन ते तीन दिवसात पाणी सोडून बंधारे भरून घेण्याच्या सूचना दिल्या  असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. 

             या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये सीना धरणातून पाणी सोडणे बाबत आपणाकडे मागणी केली होती त्याबाबत आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत  शेतकऱ्यांना आज पाण्याची काही प्रमाणात आवश्यकता असल्याने या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सीना धरणातून पाणी सोडता येणे शक्य आहे का याबाबत सविस्तर माहिती घेऊन व चर्चा करून अधिकाऱ्यांनी त्याला सहमती दर्शवत काही प्रमाणात पाणी सोडण्यात हरकत नसल्याचे सांगितले त्याबाबत लवकरच डाव्या कालव्यातून पाणी सोडून त्याखालील असणारे बंधारे ,नाले भरून घेण्याच्या सूचना आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा व काही प्रमाणात उन्हाळी पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यावर्षी तालुक्यात कोठेही पाण्याची टंचाई भासली नाही त्यामुळे पाण्याचे टॅंकर लावण्याची आवश्यकता लागली  नाही, पावसाळाही तोंडावर आला आहे, सीना धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा शिल्लक आहे त्याचा वापर आवश्यकते नुसार केला जाणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

No comments