Breaking News

पतीनेच प्रेग्नंट पत्नीला चाकूने मारल्याचं वृत्त चुकीचं', मग अमेरिकेत नेमकं काय घडलं?

बालाजी आणि आरती रुद्रवार

अंबाजोगाई मधील तरुण दाम्पत्याच्या संशयित मृत्यूबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. पण जेव्हा दृष्टिकोन न्यूज ने रुद्रवार कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी याप्रकरणी काही गोष्टी फेटाळून लावल्या आहेत.

न्यू जर्सी (अमेरिका): अंबाजोगाईमधील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अमेरिकेतील काही मीडिया हाऊसने असं वृत्त दिलं आहे की पती बालजी रुद्रवार यानेच आपल्या प्रेग्नंट पत्नीची चाकू भोसकून हत्या केली असावी. पण हे वृत्त चुकीचं असल्याचं रुद्रवार कुटुंबीयांनी 'दृष्टीकोन न्यूज 'शी बोलताना सांगितलं आहे. नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील बालाजी रुद्रवार आणि त्याची पत्नी आरती रुद्रवार यांचा संशयितरित्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय वेळेनुसार बुधवार (7 एप्रिल) रोजी रात्री या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यावेळी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचं समजतं आहे. पण यावेळी स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जात आहे की पती बालाजी यानेची पत्नीला चाकून भोसकून तिची हत्या केली असावी आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. त्यामुळे याप्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.

यावेळी 'दृष्टीकोन न्यूज ,ने अंबाजोगई येथे राहणाऱ्या रुद्रवार कुटुंबीयांशी संपर्क साधला तेव्हा याबाबत बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की, 'पतीने पत्नीची हत्या केल्याच किंवा आत्महत्येचं वृत्त हे चुकीचं आहे. दोघेही खूप समंजस होते आणि त्यांच्यात काही वाद देखील नव्हते. त्यामुळे अशाप्रकारचं जे वृत्त समोर येत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हाला तरी अद्याप तेथील प्रशासनाकडून किंवा पोलिसांनी आम्हाला नेमकं काही कारण सांगितलेलं नाही.' असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

...तर अमेरिकेत नेमकं घडलं तरी काय?

बालाजी आणि आरती हे अमेरिकेतील न्यू जर्सीतील अर्लिंग्टन येथे गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. पण दोनच दिवसांपूर्वी त्यांचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले होते. खरं तर रुद्रवार दाम्पत्याची 4 वर्षांची मुलगी जेव्हा बाल्कनीत बसून रडत होती तेव्हा शेजाऱ्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यावेळी त्यांनी घरात डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री

या प्रकरणी अमेरिकन मीडिया पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं वृत्त दाखवत असली तरी याबाबत अद्याप तरी अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. सध्या अमेरिकेतील पोलीस या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तसंच याबाबतच वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना याप्रकरणी नेमका अंदाज वर्तवता येणार आहे. त्यामुळे पतीनेच पत्नीची हत्या केली असावी या वृत्ताला पोलिसांनी तरी दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, बालाजी यांच्या वडिलांशी दृष्टीकोण न्युज'ने संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, 'बालाजीचा दोन दिवसापूर्वी फोन आला होता. पण त्यावेळी आमची घरगुती चर्चा झाली होती. तेव्हा तो काही नैराश्यात आहे असं काही वाटलं नाही. तो खुश होता. त्यामुळे नेमकं काय झालं हे आम्हाला देखील समजलं नाही. आम्हाला सांगण्यात आलं की, दोघांचे मृतदेह इकडे मिळण्यासाठी 9 ते 10 दिवस लागतील. त्यामुळे त्यांच्यावर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात यावे असा आम्ही निर्णय घेतला आहे.'

No comments