Breaking News

हा कसला लॉक डाऊन ? पंधरा दिवस नाही पंधरा महिने जरी वाढवला तरी कोरोना नियंत्रणात येणार नाही - गणेश बजगुडे पाटील


प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे बीडकरांच्या जीविताला धोका

बीड :  राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून "ब्रेक द चेन"  नावाखाली राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनमूळे राज्यातील इतर काही जिल्ह्यामधे काही प्रमाणात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र दुर्दैवाने बीड जिल्ह्यातील कोरोना पॉजीटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी देखील प्रशासन कसल्याही प्रकारचे ठोस पावले न उचलता फक्त बघ्याची भूमिका घेत असून आश्याप्रकरे लॉकडाऊन जर राहिले तर पंधरा दिवस नाही पंधरा महिने जरी वाढले तरी कोरोना नियंत्रणात येणार नाही आसा  आरोप शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केला आहे. 

       राज्य सरकारने काल पुन्हा पंधरा दिवसाचा लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय योग्यच आहे, परंतु मागील पंधरा दिवसाच्या लॉकडाऊन मूळे बीड जिल्ह्यात किती प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली याचा विचार निश्चितच केला पाहिजे. एकीकडे ब्रेक द चेन च्या नावाने सरकार लॉक डाऊन करत आहे. मात्र बीड जिल्ह्यात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. लॉक डाऊनच्या नावाने चढ्या भावाने सर्व दुकाने व्यवसाय सुरू आहेत. 

रस्त्यावर नेहमीचीच रहदारी आहे, चौका चौकात रिकामटेकड्या लोकांचे टोळके दिसत आहेत. बीड शहराचा आसा एक भाग नाही जिथे रस्त्यावर गर्दी नाही व गेल्या पंधरा दिवसात रुग्णांचे प्रमाणही कमी होत नाही. तरी देखील प्रशासन कसल्याही प्रकारची कडक कारवाई नकरता फक्त बघ्याची भुमिका घेत आसेल तर "हा कसला लॉक डाऊन ?" आहे आसा प्रश्न निर्माण होतो. यावर वेळीच कठोर पावले नाही उचलली तर आज हजार दीड हजार असलेली रुग्णांची संख्या कधी पाच दहा हजारावर जाईल हे कळणार देखील नाही व पंधरा दिवस काय पंधरा महिने जरी लॉक डाऊन केले तरी परिस्थिती आटोक्यात येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने फक्त बसुन बघ्याची भुमिका नघेता लॉकडाऊनची कडक अमलबजावणी केली पाहिजे असे आवाहन शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.

No comments