Breaking News

केज - अंबाजोगाईमध्ये विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी


वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर, सडकफिर्‍यांना दिला दम

अंबाजोगाई / केज : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अंबाजोगाई आणि केज शहरात आज विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. केजमध्ये तहसीलदारांसह प्रशासनातले अन्य अधिकारी रस्त्यावर उतरले तर अंबाजोगाई शहरात चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करून लॉकडाऊन पाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

बीड शहरासह अंबाजोगाई, केज, आष्टी या चार तालुक्यात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई आणि केज प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारी कठोर पावले उचलले. अंबाजोगाई शहरात शुक्रवारी पासूनच विकेंड लॉकडाऊनची जनजागृती करण्यात येत होती. आज प्रत्यक्षात त्याची कडक अंमलबजावणी प्रशासनाने केली. अंबाजोगाईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. शहरातल्या चौका चौकात, नाक्या नाक्यावर पोलीसांनी सडकफिर्‍यांना समज दिली. इकडे केज शहरात अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार दुलाजी मेडगे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्वत:हून रस्त्यावर उतरून फिरणार्‍या नागरिकांना समज देत काही सडकफिर्‍यांना दम दिला. त्यापुर्वी सकाळी पोलीसांचे पथसंचलन शिवाजी चौक, कानडी रोड, बसस्थानक, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला या प्रमुख रस्त्यांवर करण्यात आले.

No comments