केज पोलिसांची अवैध चोरट्या दारू विक्री विरुद्ध कार्यवाही
गौतम बचुटे । केज
केज पोलिसांनी अवैद्यरित्या चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असलेल्या एका इसमास ताब्यात घेत त्याच्या कडून देशी दारू जप्त केली.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३ एप्रिल शनिवार रोजी पोलीस पथक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदयावर कार्यवाही करणे कामी पेट्रोलिंग करत आसतांना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत अशी माहिती मिळाली की, पिसेगाव फाटया जवळ लक्ष्मण विलास काळे रा.पिसेगाव फाटा ता. केज हा विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी दारुची चोरटी विक्री करत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, धनपाल लोखंडे, गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे आणि दिलीप गित्ते यांनी दोन पंचा समक्ष सकाळी ११:०० वा अचानक छापा मारला असता लक्ष्मण विलास काळे वय, २२ वर्ष हा अवैद्य रित्या दारू विक्री करीत असताना आढळून आला.
सदर ठिकाणी पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या जवळ टॅगो पंच नावाच्या १५० बॉटल ज्याची एकूण किंमत ३ हजार ९०० रु. असलेला माल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून लक्ष्मण विलास काळे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments