Breaking News

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांनी जिल्हा रूग्णालयातील ६५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करून घेतले


जिल्हा रूग्णालयासह कोव्हिड सेंटरचा घेतला आढावा, कोव्हिड वार्डात जावून रूग्णांना दिला आधार

स्वच्छतेसह रूग्णांच्या प्रश्‍नांची ऑन दी स्पॉट सोडवणूक 

बीड : आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयातील नर्सिग हॉस्टेलमधील ६५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करून घेतल्याने बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णलयातील कोव्हिड वार्डात जावून त्यांना येणार्‍या अडचणी समजवून घेत, त्यांना आधार देत त्या समस्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जिल्हा रूग्णालयासह त्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज येथील कोव्हिड सेंटरचा आढावा घेत वार्ड बॉय, स्वच्छता, डाटा इंट्रीसह आवश्यक मॅन पावर घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत. रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या सर्वजण मिळवून कोरोना हरविण्यासाठी लढुयात. कोरेानाच्या या संकट काळात निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.
शनिवार दि.१७ एप्रिल २०२१ रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालय येथील कोव्हिड रूग्णालय, लॉ कॉलेज, आयटीआय, पॉलिटेक्निक येथील कोव्हिड सेंटरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गिते, आरएमओ राठोड, डॉ.हुबेकर, डॉ.आंधळकर, संगिता धिंडकर आदी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रूग्णालय परिसरात नर्सिंग हॉस्टेलमध्ये कोव्हिड वार्ड तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतू ऑक्सिजन वार्ड तयार करण्याचे काम संतगतीने सुरू होते, यावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी उभा राहूनच हॉस्टेलमधील ६५ ऑक्सिजनचे बेड कार्यान्वित करून घेतले आणि उर्वरित तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेच्या शिष्ट मंडळाने आपल्या व्यथा आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कानी टाकल्या. परिचारीका भगिणींच्या अडचणी समजवून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. संघटनेच्या मागणीनुसार वॉर्ड बॉय, डाटा इंट्री ऑपरेटर, स्वच्छता कामगार तातडीने वाढवण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. कोव्हिडच्या परिस्थितीत आपण सगळे एकत्र येवून लढतोय, आपल्या एकी, स्वंयशिस्त एकमेकांना आधार देणे यावेळी अत्यंत आवश्यक आहे. ही परिस्थिती कठीण असल्याची जाणीव आहे. परंतू यातून मार्ग काढून आपण पुढे जावू या, या कोरोना काळात निधीची कमतरता पडू देणार नाही, रूग्णांची गैरसोय होता कामा नये यासाठी सर्वांनीच खबरदारी व आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केली आहे.
मॅन पावर वाढवली जाणार
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयातील कोव्हिड वार्डासह कोरोना बाधित रूग्णांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटना यांच्यासह अनेकांकडून मॅन पावर वाढवण्यात यावी अशी मागणी वारंवार झाली. त्यामुळे वार्ड बॉय, डाटा इंट्री ऑपरेटर, स्वच्छता कर्मचारी व कोरोना वार्डात आवश्यक ती मॅन पावर वाढविण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अजित कुंभार, जिल्हाधिकारी जगताप यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हा रूग्णालयातील प्रशासनाने मॅन पावर वाढविण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.


घाबरू नका, कोरोनालाही हरवूया -आ.संदिप भैय्या क्षीरसागर
बीड जिल्हा रूग्णालयात कोव्हिड वार्डाची आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील कोरोना बाधित असलेल्या माता, भगिनी, वडिलधारी व बंधुंना मानसिक आधार दिला. यावेळी रूग्णांशी संवाद साधत असतांना घाबरू नका, काळजी घ्या, कोरोनाला आपण हरवूया, जिल्हा रूग्णालयातील टीम, आम्ही तुमच्या सोबत आहोत. योग्य आणि आवश्यक ते उपचार सुरू आहेत. काही कमी पडू देणार नाही असा आधार आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी रूग्णालयातील रूग्णांशी बोलतांना दिला आहे.

कार्डियाक रूग्णवाहिका जिल्हा रूग्णालयाला उपलब्ध होणार
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या स्थानिक निधीतून कोव्हिड संदर्भात आवश्यक ती उपाय योजना करण्यासाठी निधी तर दिला जाणारच आहे परंतू कार्डियाक रूग्णवाहिका घेण्याचा निर्णय ही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी घेता असून या बाबत तशा सूचनाही त्यांनी जिल्हा रूग्णालय प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या आहेत. त्यामुळे आता बीडच्याजिल्हा रूग्णालयात कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

No comments