Breaking News

विना मास्क फिरणाऱ्या दोघांवर तर नियमांचे उल्लंघन करणारे ३ दुकाने केली सील


शिरुर नगरपंचायतीची कारवाई , ५२०० रुपयांचा दंड केला वसुल 

शिरुर का : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून नागरिक मात्र मास्क विना फिरत असल्याचे दिसत असताना शिरुर कासार शहरात विना मास्क फिरणार्‍या दोघांवर तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३ दुकानांवर कारवाई करुन पाच हजार २०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई  नगरपंचायत मंगळवारी (दि.२०) केली.

 

आजपर्यंत शिरुर कासार नगरपंचायती मार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण ४२४ लोकांवर कारवाई करुन १,५३,४०० रुपयांचा दंड  करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकुण ४० दुकानांवर कारवाई करुन ५०,०००  रुपायांचा असा एकूण २,०३,४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 

शहरातील सर्व नागरीकांनी विनाकारण बाहेर फिरु नये , संचारबंदी असल्याने अत्यावश्यक कारण असेल तरचं सकाळी ७ ते ११ या वेळेत घराबाहेर पडावे आणि, घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालणे बंधनकारक अन्यथा नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागेल. 


१) मुखपट्टी / मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.

२) सामाजिक अंतर राखणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फूटाचे अंतर राखणे बंधनकारक आहे. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक आहे आणि अशा आस्थापनांमध्ये एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक / व्यक्ती असणार नाहीत.

३) सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास प्रतिबंध-

सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध दंडाची आकारणी करणेत येत आहे .

४) सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी इ. खाण्यास / पिण्यास प्रतिबंध आहे.

५)अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी / ग्राहक यांच्येसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सॅनिटायझरची सुविधा पुरवून सर्व येण्या आणि जाण्याच्या दारांमध्ये (प्रवेश व बहिर्गमन ) आणि सामुदायीक जागांच्या ठिकाणी या उपाययोजना ठेवाव्यात.

६) कामाची जागा, सामुदाईक वापराची ठिकाणी त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी ठिकाणे वारंवार निर्जंतुक करणेत यावीत.

७)खाजगी/शासकिय बँकविषयक आस्थापनांमधील व्यवस्थापनाने तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल. दोन कामाच्या पाळ्यांमध्ये अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न-भिन्न असतील याची दक्षता घ्यावी. 

  सर्व शासन नियमांचे पालन करुन नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे. जे लोक कोविड19 ची नियमावली मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही नगरपंचायतीमार्फत देण्यात आला आहे. 


No comments