नियमांचे पालन करू पण आंबेडकर जयंती साजरी करू : लखन हजारे
केज : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विषयी केज येथील चळवळीतील युवा नेतृत्व आणि अन्याय अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरनारे लखन हजारे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, आम्ही कोरोना आणि साथरोगाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करू; पण आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास परवानगी द्या.
पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रम घेऊन या वेळी आम्ही साजरी करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची मोठी परंपरा आहे. गावागावात जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरी केला जातो. गेल्या वर्षी प्रशासन यांनी आवाहन करताच केज शहर आणि तालुक्यातील जयंतीचे सर्व कार्यक्रम स्थगित करून सर्व आंबेडकरप्रेमी प्रशासना सोबत राहिले होते. परंतु या वेळी वातावरण वेगळे आहे. गावागावातील आंबेडकरप्रेमींना प्रश्न पडला आहे की, मंत्र्या-संत्र्यांच्या वाढदिवसाला लाखोंची गर्दी जमते. मोर्चे चालतात. मग महापुरुषांची जयंती का नाही ? म्हणून आम्ही या वेळी सुद्धा प्रशासनाच्या नियम व अटींचा मान-सन्मान करुन सर्वजण प्रशासना सोबत आहोत; पण या वेळी सर्व नियमांचे पालन करून आंबेडकर जयंती साजरी करू द्या. आम्ही महामानवास आभिवादन करणार आहोत. शासन आणि प्रशासनाने भीम सैनिकांचा अंत न पहाता सहकार्य करावे. अशी विनंती लखन हजारे यांनी प्रशासनास प्रसिध्दी पथकाद्वारे केली आहे.
No comments