Breaking News

प्रत्येक पं.स.गणात कोवीड सेंटरची उभारणी करणार - आ.सुरेश धस

के. के. निकाळजे । आष्टी  

कोरोनावर मात करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये कोरोनाची असलेली भीती घालवण्यासाठी आ.धस पिता-पुञांनी आष्टी मतदारसंघ पिंजून काढला आहे.त्यातच सद्यस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर भर पडत असल्याने सर्वसामान्य जनतेला रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. प्रशासनाचे नियोजन कोते त्यासाठी एक पाऊल पुढे टाकून एका पं.स.गणात एक कोवीड सेंटरची उभारणी केल्यास गोरगरीब रुग्णांची होणारी हेळसांड थांबण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी शनिवारी जनजागृती अभियान दौऱ्याप्रसंगी केले आहे.


कोरोनाबाबत आष्टी मतदारसंघात सध्या आ.सुरेश धस त्यांचे पुञ जयदत्त व सागर धस हे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावर नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना यासह अॕन्टीजन टेस्ट,लसीकरण आदी विषयावर नागरिकांसोबत संवाद साधत आहेत.याच पार्श्वभूमीवर सरकारी यंञना तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांची फरफट होत असल्याने यामध्ये काहींना आपला जीव गमावण्याचीही वेळ आल्याचे दिसून आल्याने ही फरफट थांबविण्यासाठी आष्टी मतदारसंघात भाजपा,मच्छिंद्रनाथ देवस्थान,आष्टी तालुका दुध संघ,कडा कृषी उत्पन्न बाजार समिती,व आ,सुरेश धस मिञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एका पं.स.गणात एक कोवीड सेंटरची उभारणी केली जाणार आहे.या कोवीड सेंटरला लागणारे मनुष्यबळ व महिन्याला अंदाजे होणारा दहा लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचा भार हा आमच्यासह सामाजीक संघटना,सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्ती यांच्यावतीने केला जाईल. त्यामुळे कोरोनाबाधीत असलेल्या रुग्णावर जागच्या जागी उपचार होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.


No comments