Breaking News

पोलीस कॉन्स्टेबल आघाव यांचा प्रामाणिकपणा : एक तोळे सोने केले परत

 गौतम बचुटे । केज

केज तालुक्यातील एका इसमाचे हरवलेल्या सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे सुमारे पन्नास हजार रु किमतीचे दागिने केज पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल आघाव यांना सापडले होते. पोलीस कॉन्स्टेबल आघाव इसमाची त्याच्या खिशातून एक तोळा सोन्याचे दागिने असलेली कागदाची पुडी हरवली. ती पोलीस कॉन्स्टेबल आघाव यांना सापडले. हे दागिने कोणाचे आहेत हे माहीत नव्हते. 

त्यानंतर काही वेळात एक इसम पोलीस ठाण्यात येऊन पोलीस ठाणे अंमलदार आघाव यांना आपल्या हरवल्याचे सोने हरवल्याची व्यथा सांगून धाय मोकलून रडू लागला आणि साहेब तपास करा. असे सांगून लागला. त्या नंतर आघाव यांनी चौकशी करून त्याची ओळख पटविली. सदर दागिने हे त्या इसमाचे असल्याची खात्री पटताच त्याला ते दागिन  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली परत केले.


या मुळे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे तसेच सहायक फौजदार महादेव गुजर, लांडगे, सेंगर, कादरी, शिंदे आणि केज पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी यांनी आघाव यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे. 

No comments