Breaking News

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.गंगाधर गित्ते यांचे निधन


परळी
:  संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध बहूजनवादी विचारवंत 'राष्ट्रसंत भगवानबाबा महाराजांचे विचार व वंजारी समाजाची दशा आणि दिशा,' नामदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस, ''अण्णाभाऊ साठेंची शाहीरी' अशा पुस्तकांचे लेखक तथा फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे कृतीशील  प्रचारक प्र.गंगाधर गित्ते यांचे दि.१८/४/२०२१ रोजी  हिंगोली येथे निधन झाले.

 प्रा.गिते सर यांनी पुस्तके लेखना बरोबरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर अनेक व्याख्याने दिली. आपल्या गोड वाणीने लोक जोडण्यात त्यांचा हातखंडा होता.पुरोगामी विचाराने भारावून गेलेल्या गित्ते सरांनी स्वतः च्या मुलींचे विवाह ही सत्यशोधक पद्धतीने केली .संपूर्ण गीते परिवार हा चळवळीत नेहमी सक्रिय असतो.आर्य समाज, बाममसेफ,फुले -आंबेडकरी अभ्यास समूह अशा सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिले.दैनिक मूलनिवासी नायक तथा अनेक मासिके, साप्ताहिकांतून सतत वैचारिक लिखान केले. बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले .जवळा बाजार जि. हिंगोली राहत ते मूळ चे राणी सवरगाव त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डॉ शशिकांत पट्टेकर, भगवान साकसमुद्रे,नामदेव दळवी, विजय साळवे ,सीतले सर,लक्षीमन वैराल, दत्ता काळेआदीं प्रा. गंगाधर गिते सरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

No comments