Breaking News

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले


पिडीत पालक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; महाराष्ट्र पोलिसांनी न्याय द्यावा

बीड : बीड जिल्ह्यातील कुंदेवाडी ता.वडवणी येथील ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अद्याप तपास लागला नाही. पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून आपली कैफियत त्यांच्याकडे मांडणार आहेत. मुलीला पळवून नेण्याची घटना नरंदे ता.हातकलंगले जि.कोल्हापुर येथे घडली असून या प्रकरणी वडवणी जि.बीड येथून 363 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील कुंदेवाडी येथील ऊसतोड मजुर कोल्हापुर जिल्ह्यातील नरंदे ता.हातकलंगले येथे सहकुटूंब ऊसतोडणीसाठी गेले असता त्यांच्या अल्पवयीन मुलीला बप्पा गोरख देठे याने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बप्पा देठे याचे वडील गोरख देठे तसेच पोपट देठे, राजूबाई देठे यांनी या कामी सहकार्य केल्या प्रकरणी हातकलंगले पोलिस ठाण्यामध्ये भादवि 1860 कलम 363, 34 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर अद्याप पोलिसांकडून तपास झाला नसल्यामुळे फिर्यादी  मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून हा सर्व प्रकार मुख्यमंत्रीदरबारी फिर्यादी हे मांडणार आहेत. 

No comments