Breaking News

बोरगाव खून प्रकरण : बहिणीचा खून करून पसार झालेल्या मारेकरी भावासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी केलं गजाआड

गौतम बचुटे । केज   

सख्या भावाने आपल्या विधवा बहिणीचा  निर्घृणपणे खून केल्यानंतर पसार झालेल्या तिच्या मारेकरी भावाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथून सोमवारी (दि.२६) अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथे राहत असलेली विधवा शीतल लक्ष्मण चौधरी केज तालुक्यातील बोरगाव येथे माहेरी  आली होती. आठ दिवसांपूर्वी आलेली शीतल 21 एप्रिल 2021 च्या रात्री जेवण करून झोपी गेली होती. मात्र मयत शीतलला तिची ही अखेरची रात्र असेल असं तिला स्वप्नात देखील वाटलं नसेल. दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी झोपी गेलेल्या शीतलच्या डोक्यात वार करून निर्घृणपणे तिचा खून केला आणि घटनास्थळावरून ते पसार झाले. शितल मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. 

संबंधित बातमी पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

स्वतः चाच भाऊ बहिणीसाठी वैरी ठरलेल्या या धक्कादायक घटनेने केज नव्हे तर जिल्ह्या हादरून गेला होता. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेतील मारेकरी भाऊ व त्याचा साथीदार मित्राला पकडण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते.  मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला मयत शीतलचा  मारेकरी भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे आणि त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथून केज पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, डीबी पथकाचे दिलीप गिते, अशोक नामदास, वैभव राऊत आणि बाळासाहेब अहंकारे यांनी ही कार्यवाही केली. 


No comments