Breaking News

सावधान....बीड शहर होतंय धुळीचे शहर...! जिल्हाधिकारी साहेब तातडीने उपाय योजना करा वंचितच्या अजय सरवदे यांची मागणी


बीड : न.प.बीडच्या वतीने शहरात विविध योजनेअंतर्गत रस्ते झाले आहेत काही रस्ते अपूर्ण आहेत. या रस्त्याच्या कामामध्ये मातीमध्ये सिमेंट आहे की सिमेंटमध्ये माती हे कळत नाही. मोठी मोठी वाहने या रस्त्याने वेगाने धावत आहेत. 200 मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर पेक्षा जास्त धूलिकण हवेमध्ये असल्याचे दिसून येते. हवा प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. 

रस्त्यावरील धुलीकणामुळे सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, दुचाकी वाहनचालक व पादचाऱ्यांना याचा त्रास होत असून या धुळीकणामुळे डोळ्यांचे आजार, अ‍ॅलर्जीचा त्रास, सर्दी, खोकला, ब्राँकॉयटिस,श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार उद्भवत आहेत यास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण महामंडळचे क्षेत्रीय अधिकारी व न.प.बीडचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. न.प.बीडच्या वतीने धूलिकण कमी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जाते नाही. न.प.प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

स्वच्छता विभागाचे अधिकारी हे फक्त नावालाच आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवादी रुपयांचा अपहार केला जात आहे.परंतु बीड शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून लक्ष घालून बीड शहरात शुद्ध हवा मिळावी यासाठी उपाय योजना आखावी अशी मागणी वंचितचे अजय सरवदे यांनी केली आहे.

कोव्हीड प्रादुर्भावामुळे सर्व सामान्य नागरिक खचले आहेत. धुलीकणामुळे आजारी पडणाऱ्या नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी,मुख्यधिकारी यांचेमार्फत मोफत उपचार मिळावे यासाठी अर्ज करावेत व जिल्हाधिकारी, मुख्यधिकारी यांनी बीड शहरात ऐसी गाडी ऐवजी दोन चाकी वाहनावर प्रवास करून दाखवावा जेणे करून सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी लक्षात येतील. असे अजय सरवदे म्हणाले. 


No comments