Breaking News

कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करून शिरूरमध्ये कालिका देवीचा दिप अमावशा उत्सव साजरा


पालखीचे भोई फक्त पंच , मंदिरातच पालखी प्रदक्षणा तर प्रातिनिधिक स्वरूपात एकच नैवैद्य, एकच कावड व संबळ वाद्य 

शिरूर कासार : येथील जाज्वल्य देवस्थान तथा पंचक्रोशितील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालिका देवीचा उत्सव आज तिस-यांदा अगदी पंचाच्याच उपस्थितित पार पडला ,मंदिरातच पालखी प्रदक्षणा व पंचच पालखीचे भोई  ,एकच कावड ,एकच प्रातिनिधीक स्वरूपात नैवेद्य समर्पीत करण्यात आला.

वर्षभरात दोन वेळा जुन्याची व नव्याची अमावशा उत्सव साजरा होत असतो अगदी पुणा मुंबई सह बाहेर गावी असलेले आवर्जुन देविच्या या उत्सवाला व दर्शनाला हजारो भाविक  हजर असतात मात्र तीस-यांदा हा उत्सव मंदिरातच करवा लागला . "कोरोना " चा वाढता प्रादुर्भाव तसेच प्रतिबंध म्हणून  निर्बंध असल्याने विश्वस्त मंडळांनी हा उत्सव पार पाडला. 

शंभरावर भाविक कावडी घेऊन शनीचे राक्षसभुवन येथून गंगाजल आणत असतात ,देवीची पालखी सिंदफणा तीरावर सवाद्य जात असते रात्री किमान नवु वाजेपर्यंत पुजा ,महाआआरती सोपस्कार झाल्यानंतर मंदिरात देवीचे आगमन होते ,घराघरातुन पुर्ण पोळीचा नैवैद्य येत असतो या सर्व बाबीला बाजुला सारून परंपरेला बाधा नको म्हणून मोजक्याच उपस्थितीत हा कुलाचार संपन्न झाला.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष रोहीदास पाटील ,सचिव लक्ष्मणराव गाडेकर , उपाध्यक्ष गोविंद पाटील ,दत्ता पाटील ,वैभव गाडेकर ,राजु गाडेकर ,प्रमोद दगडे ,अशोक भांडेकर , डॉ रमणलाल बडजाते ,मधुकर नगरकर व पुजारी भांडेकर अशा मोजक्याच उपस्थितीत दिप अमावशा सोहळा साजरा करण्यात आला असून शषीकांत कापरे यांनी सर्वाचे प्रतिनिधीत्व करत देवीला नव्या गव्हाच्या पुरण पोळीचा नैवेद्य समर्पित केला ,दिवसभर भाविक मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन जात होते. तसेच " कोरोना " नियमांचे पालन करतच हा कुलाचार भावनेला बाजुला ठेवून साजरा करावा लागला असे मंदिर विश्वस्त अध्यक्ष रोहीदास पाटील यांनी सांगितले.

No comments